Maharashtra Weather : फेंगलचा महाराष्ट्राला तडाखा! हिवाळ्यात कोसळणार पावसाच्या धारा

हवामान विभागाकडून 'या' जिल्ह्यांना अलर्ट


मुंबई : सध्या हिवाळी मोसमाला सुरुवात झाली आहे. माञ काही दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या फेंगल चक्रीवादळामुळे (Fengal Cyclone) राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी (Rain) कोसळल्या, अशातच अजूनही फेंगल चक्रीवादळाचा जोर कायम असल्याचे दिसून येत आहे. फेंगल चक्रीवादळाचा महाराष्ट्रालाही (Maharashtra Weather) तडाखा दिला असून येत्या २४ तासांत कमी दाबाचा पट्टा कमकूवत होणार आहे. त्यामुळे काही जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळणार (Rain Alert) असल्याचे हवामान विभागाने (IMD) सांगितले आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, काल राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातही काही भागात हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस होता. आता आज पावसाचा जोर काहीसा वाढणार असून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.



कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?


आज कोकणातील रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यांना वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर रायगड जिल्ह्यातही हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार असून पुणे व सातारा घाट परिसरात मुसळधार पाऊस येणार आहे.


तसेच मध्य महाराष्ट्रात आज पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला  आहे. नगर जिल्ह्यात हलक्या सरींचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात धाराशिव आणि लातूर या दोन जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट देण्यात आला असून बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत   हलक्या ते मध्यम पावसाची अपेक्षा आहे.

Comments
Add Comment

फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला नवं वळण, प्रशांतच्या बहिणीचा मोठा खुलासा

सातारा : साताऱ्यातील फलटण येथे महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याच्या प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळालं आहे. या

फलटणमध्ये महिला डॉक्टरची आत्महत्या, निलंबित PSI बदनेचा शोध सुरू

सातारा : सातारा जिल्हातील फलटण मधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर पोलिसांना २४ तासांच्या आत आरोपी प्रशांत

तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार बंद, भाविकांच्या गर्दीमुळे मंदिर समितीने घेतला निर्णय

तुळजापूर : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरची आई तुळजाभवानी ही अनेक कुटुंबांची कुलस्वामिनी आहे. याच कारणामुळे या

पाच महिन्यांचा छळ आणि अखेर दुर्दैवी शेवट; डॉक्टर तरुणी प्रकरणाची A टू Z कहाणी उघड

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने पोलिस आणि राजकीय दबावाला कंटाळून आत्महत्या केल्याने

मराठा सेवा संघाच्या नकुल भोईरची हत्या, पत्नीला अटक

पुणे: पुणे जिल्ह्यातील चिंचवड परिसरात मध्यरात्री घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. मराठा सेवा संघ आणि

पुणेकरांसाठी पुन्हा त्रासदायक बातमी; भिडे पूल पुन्हा बंद, नववर्षातच खुला होण्याची शक्यता

पुणे : पुणेकरांच्या दैनंदिन प्रवासातील एक महत्त्वाचा दुवा असलेला बाबाराव भिडे पूल पुन्हा एकदा वाहतुकीसाठी बंद