पंढरपूर : मार्गशीर्ष महिना (Margashirsha Month) हा देवांचा विश्रांती काळ असतो. याकाळात पंढरपुरातील विठूरायाही (Pandharpur Vitthal Temple) चंद्रभागेच्या तीरावर निर्जन आणि निसर्गरम्य अशा विष्णुपदावर संपूर्ण महिनाभर मुक्कामासाठी येतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही मार्गशिष महिना सुरु होताच विठुराया पंढरपूर जवळच असलेल्या गोपाळपूर येथील चंद्रभागेमध्ये असलेल्या विष्णूपद मंदिरात वास्तव्यास आले आहेत. यावेळी विष्णूपद मंदिरात भाविकांची दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. मात्र मार्गशिष महिन्यातील या विठुरायाच्या मुक्कामाची कोणती आख्यायिका आहे, जाणून घ्या.
Oath Ceremony : मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याची पत्रिका आली समोर!
शेकडो वर्षांपासून पाळल्या जाणाऱ्या परंपरेनुसार, जेव्हा रूक्मिणी विठुरायावर रूसून दिंडीर वनात आली, त्यावेळी देवीच्या शोधात विठ्ठल ज्या ठिकाणी पंढरपुरात प्रथम आले. ते ठिकाण म्हणजे चंद्रभागेच्या पात्रातील मोठा खडक म्हणजे विष्णूपद. मार्गशीर्ष अमावस्येपर्यंत याठिकाणी देवाचा मुक्काम असतो, अशी आख्यायिका आहे.
त्याचबरोबर विष्णूपद मंदिरात एका मोठ्या शिळेवर मध्यभागी देवाचे समचरण आणि देहूडाचरण पाऊले उमटलेली आहेत. त्यासोबत काठी ठेवल्याची व काल्याच्या वाडग्याची खूण आहे. या शिळेवर दगडी मंडप उभारला आहे. येथील खांबावर चतुर्भुज समचरण विष्णुमूर्ती आणि देहूडाचरण मुरलीधराची आकर्षक अशी मूर्ती कोरण्यात आली आहे. याच ठिकाणी विठुरायाने आपल्या सवंगडी व गाईसह क्रीडा केल्याचे व येथेच त्यांनी सर्वांसोबत भोजन केले होते. तेव्हापासून या ठिकाणी देवाची आणि गाईची पाऊले उमटले असल्याचेही म्हटले जाते.