मुंबई : महायुती (Mahayuti) सरकारचा शपथविधी सोहळा उद्या सायंकाळी ५ वाजता मुंबईच्या आझाद मैदानावर (Azad Maidan) पार पडणार आहे. तत्पुर्वी या शपथविधीची पहिली पत्रिका समोर आली आहे. या पत्रिकेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadnavis) स्पष्ट उल्लेख आहे. या पत्रिकेचा फोटो आता समोर आला आहे.
Sukhbir Singh Badal : मोठी बातमी! सुवर्ण मंदिराच्या गेटवर सुखबीर बादल यांच्यावर गोळीबार!
महायुतीच्या शपथविधी सोहळा उद्या गुरूवारी सायंकाळी पार पडणार आहे.या शपथविधी सोहळ्याचा पहिली निमंत्रण पत्रिका समोर आली आहे. या पत्रिकेत ‘महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस’ असा स्पष्ट उल्लेख आहे. त्याचसोबत या पत्रिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यासोबत शपथविधीची तारीख आणि वेळ देखील सांगण्यात आली आहे.