मुंबई : राज्य शासनाचा कारभार खऱ्या अर्थाने सुरू व्हायचा असला तरी जमीन मोजणीसाठी शेतकऱ्यांसह नागरिकांना चांगलाच दणका दिला आहे. २ डिसेंबरपासून प्रक्रिया सुलभ अन् सुटसुटीत केली असली तरी मोजणीचे दर दामदुप्पट केल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारा निर्णय ठरला आहे.
जमीन मोजणीच्या चार प्रकारांऐवजी आता फक्त दोन प्रकार ठेवण्यात आले आहेत. तसे आदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी १० ऑक्टोबरला शासनाने काढले होते. प्रत्यक्षात या आदेशाची अंमलबजावणी २ डिसेंबरपासून सुरू झाली आहे. यापूर्वी नियमित, तातडीची, अति तातडीची व अति अति तातडीचे असे प्रकार होते. यामध्ये प्रकारानुसार दर कित्येक पटीच्या घरात जात होते. यामध्ये आता सुलभता आणून नियमित व द्रुतगती असे दोन प्रकार करण्यात आले आहेत.
CM Oath Ceremony : शपथविधी सोहळ्यासाठी मुंबई वाहतुकीत बदल; अनेक रस्ते बंद!
नियमित मोजणीसाठी अर्ज केल्यापासून ९० दिवसांचा कालावधी ग्राह्य धरण्यात येणार आहे, तर द्रुतगती मोजणीसाठी कमाल ३० दिवसांचा कालावधी असेल. मोजणीचे दर बदलले असते तरी १ डिसेंबरपूर्वी ज्यांनी अर्ज केले आहेत. त्यांना जुन्याच दराने आकारणी होणार आहे. ग्रामीण क्षेत्रातील नियमित मोजणीसाठी दोन हेक्टरपर्यंत एक हजार रुपये फी आकारणी होती. ती आता दोन हजार रुपये करण्यात आली आहे.
ई-मोजणी व्हर्जन-२ सिस्टीममध्ये अपलोड
ई मोजणीचे व्हर्जन-२ अॅप सिस्टीममध्ये अपलोड झालेले आहे. यामध्ये प्राप्त अर्ज व उपलब्ध मनुष्यबळ यानुसार मोजणीचे काम दिले जाणार आहे. ही सिस्टीम आता अपलोड झालेली आहे. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळात मोजणीचे नियोजन सिस्टीम करणार आहे. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळात जलद गतीने कामे होणार आहेत.
मनपा हद्दीत मोजणीचे दराचा फटका
महापालिका, नगरपालिका क्षेत्रात दोन हेक्टरपर्यंत नियमित मोजणीला २ हजार, तर द्रुतगतीला ८ हजार रुपये मोजणी फी भरावी लागेल. यानंतरच्या दोन हेक्टरसाठी १ हजार, द्रुतगतीसाठी ४ हजार रुपये शुल्क आहे. मंजूर रेखांकनातील प्रत्येक भूखंडासाठी एक हेक्टर मयदित १,५०० रुपये व दूत- गतीसाठी सहा हजार राहणार आहे.