मुंबई : महायुती सरकारचा शपथविधी (CM Oath Ceremony) उद्या मुंबईतील आझाद मैदानात (Azad Maidan) पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासह सर्व राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. तसेच यावेळी लाडक्या बहिणींसाठीही विशेष आमंत्रण असणार आहे. त्यामुळे आझाद मैदानावर होणारी मोठी गर्दी पाहता मुंबई वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहे. यावेळी अनेक मार्ग बंद करण्यात आले आहेत. दुपारी १२ वाजल्यापासून ते शपथविधी कार्यक्रम संपेपर्यंत वाहतुकीचे नियम लागू असणार आहेत.
Earthquake : तेलंगणामध्ये भूकंपाचे जोरदार झटके, महाराष्ट्र-छत्तीसगडमध्येही जाणवले हादरे
कोणते मार्ग बंद?
- महापालिका मार्ग – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वासुदेव बळवंत फडके चौकादरम्यान वाहतूक बंद
- हजारीमल सोमानी मार्ग – चाफेकर बंधू चौक ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वाहतूक प्रतिबंधित
- प्रिन्सेस स्ट्रीट ब्रिज ते कोस्टल रोड दरम्यानची दोन्ही बाजूंची वाहतूक बंद
- आझाद मैदानात पार्किंगची व्यवस्था नसल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचा आवाहन
पर्यायी मार्ग कोणते?
- चाफेकर बंधू चौक – हुतात्मा चौक काला घोडा के दुबाश मार्ग शहीद भगतसिंग मार्ग इच्छित स्थळी प्रवास.
- दक्षिणेकडील मार्ग एनएस रोड आणि कोस्टल रोडवरून श्यामलाल गांधी जंक्शनकडे वाहतूक वळवली जाईल.
पर्यायी मार्गः एनएस रोडचा वापर करावा. - सय्यद जमादार चौक ते वोल्गा चौक या मार्गावर दुपारी १२ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरू असेल.