Monday, February 17, 2025
Homeब्रेकिंग न्यूजDevendra Fadnavis : दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी प्राणपणाने हे सरकार काम करेल!

Devendra Fadnavis : दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी प्राणपणाने हे सरकार काम करेल!

देवेंद्र फडणवीसांचा निर्धार तर एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला आनंद

मुंबई : मला आनंद आहे की, अडीच वर्षांपूर्वी इथंच देवेंद्रजींनी मी मुख्यमंत्री व्हावं म्हणून माझ्या नावाची शिफारस केली होती. आज देवेंद्रजी (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री व्हावेत, अशी शिफारस आणि पाठिंब्याचं पत्र शिवसेनेच्या वतीनं आम्ही दिलं आहे. अतिशय खेळीमेळीच्या आनंदात हे सरकार स्थापन होतंय याचा आनंद आहे, असे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले. राज्यपालांकडे महायुतीच्या (Mahayuti) वतीने सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला. त्यानंतर महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Ramdas Athawale : आम्हाला पण कॅबिनेट मंत्रीपद हवं, अमित शाहांनी शब्द दिला होता!

शिंदे पुढे म्हणाले, खरं म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासात एवढं बहुमत महायुतीला कधी मिळालं नव्हतं. महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी राज्यातले सर्व घटक या राज्यातल्या प्रत्येक मतदारानं महायुतीवर मतांचा वर्षाव केला. ऐतिहासिक आणि दैदिप्यमान यश महायुतीला मिळालं. यामध्ये मागच्या अडीच वर्षात केलेल्या कामाचा वाटा आहे. सर्वसामान्यांचं सरकार म्हणून आम्ही काम केलं, मतदारांना मनापासून धन्यवाद दिले आहेत.

भाजपा नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी काल स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी गेलो होतो. तुम्ही स्वत: या सरकारमध्ये आमच्यासोबत राहायला हवं, असं निवेदन मी एकनाथरावांना केलं होतं. एकनाथ शिंदेंनी सरकारमध्ये राहावं, अशी शिवसेनेच्या आमदारांची देखील इच्छा आहे. महायुतीच्या आमदारांची देखील हीच इच्छा आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, ते आमच्या सरकारमध्ये असतील. मी एकनाथ शिंदे यांचं आभार मानतो. त्यांनी मला मुख्यमंत्री म्हणून शपथ द्यावी, असं पत्र दिलेलं आहे. अजित पवार आणि इतर पक्षांनीही पत्र दिलेलं आहे. मी सर्वांचं आभार मानतो. रामदास आठवले यांचेही मी आभार मानतो. मागील अडीच वर्षात एकनाथ शिंदे, अजित पवार आणि मी असं तिघांनी एकत्रितपणे निर्णय घेतले आहेत. आज देखील आम्हाला हे पद तांत्रिक बाब आहे. इतर आमच्या मित्र पक्षांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाईल. महाराष्ट्रातील लोकांना दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी प्राणपणाने हे सरकार काम करेलं.

पंतप्रधान यांच्या उपस्थितीत भव्य शपथविधी सोहळा पार पडणार आहे. आता आम्ही एकत्रितपणे निर्णय घेणार आहोत. जी आश्वासन दिली आहेत ती पूर्ण करु, असा निर्धारही फडणवीस यांनी व्यक्त केला.

मी दिल्लीला कोणाला भेटायला गेलो नव्हतो – अजित पवार

अजित पवार म्हणाले, मी दिल्लीला कोणाला भेटायला गेलो नव्हतो, तर माझ्या कामासाठी गेलो होतो. बंगल्याच्या संदर्भात आर्किटेकला भेटायचं होतं. सोबत आमच्या केसेस सुरु आहे, त्या संदर्भात वकिलांना भेटायचं होतं. इथल्यापेक्षा तिथे आराम मिळतो. म्हणून डोक्यातून काढून टाका मी कोणाला भेटायला गेलो होतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -