दिसपूर: पूर्वोत्तर भारतातील आसाममध्ये गोमांसावर बंदी घालण्यात आली आहे. आसाम मंत्रिमंडळाने राज्यातील सर्व हॉटेल, रेस्टॉरंट आणि सार्वजनिक ठिकाणी गोमांसावर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. दरम्यान आगामी 7 डिसेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्येही त्यांनी सांगितले.
आसाममध्ये गोमांस बंदीच्या निर्णयानंतर आसामचे मंत्री पियुष हजारिका यांनी पोस्ट केली आणि काँग्रेसला थेट आव्हान दिले. काँग्रेसने गोमांस बंदीचे स्वागत करावे किंवा पाकिस्तानात जाऊन स्थायिक व्हावे, असे हजारिका म्हणाले. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काही दिवसांपू्र्वीच सांगितले होते की, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष भूपेन कुमार बोरा यांनी त्यांना पत्र लिहून मागणी केल्यास ते आसाममध्ये गोमांस बंदी करण्यास तयार आहेत.
आसाममधील काँग्रेस खासदार रकीबुल हुसैन यांनी भाजपवर नागाव जिल्ह्यातील समगुरी विधानसभा मतदारसंघात बीफ पार्टी आयोजित केल्याचा आरोप केला होता. मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाटी ही बीफ पार्टी आयोजित केल्याचे त्यांनी म्हटले होते. यावर हिमंता यांनी हुसैन यांच्या वक्तव्याबाबत गोमांसबाबतच्या भूमिकेबाबत प्रदेश काँग्रेस अध्यक्षांना पत्र लिहिणार असल्याचे सांगितले होते. मी भूपेन बोरा यांना पत्र लिहून रकीबुल हुसैन यांच्याप्रमाणे गोमांसावर बंदी घालण्याचे समर्थन करत आहे का, असे विचारेन आणि त्यांची तयारी असल्यास गोमांसावर बंदी घालेन, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. हिंदू, मुस्लिम, ख्रिस्ती सर्वांनीच गोमांस खाणे बंद करावे, मग सर्व प्रश्न सुटतील, असेही मुख्यमंत्री त्यावेळी म्हणाले होते.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…