Sukhbir Singh Badal : मोठी बातमी! सुवर्ण मंदिराच्या गेटवर सुखबीर बादल यांच्यावर गोळीबार!

अमृतसर : अमृतसर येथील सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल (Sukhbir Singh Badal) यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. सुखबीर सिंह बादल यांना आज पहाटे गोळ्या घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुवर्ण मंदिराबाहेर हल्लेखोराच्या गोळीबारानं एकच खळबळ उडाली. मात्र, तिथे उपस्थित लोकांनी हल्लेखोराला पकडलं. सुखबीर सिंह बादल यांच्यावर हा जीवघेणा हल्ला तेव्हा झाला, जेव्हा ते सुवर्ण मंदिराच्या बाहेर द्वारपाल म्हणून धार्मिक शिक्षा भोगत होते.



अमृतसर इथल्या सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळीबाराचा प्रयत्न झाला आहे. एका व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. गोळीबार करणाऱ्या आरोपीला घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी रोखलं व त्याला ताब्यात घेतलं. नारायण सिंह असं आरोपीचं नाव आहे. सुखबीर सिंग बादल यांना धार्मिक शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यासाठी ते सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर बसले होते. यावेळी अचानक एक व्यक्ती आला व त्याने सुखबीर सिंग बादल यांच्या दिशेने गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिथे उपस्थित लोकांनी त्याला पकडलं. आरोपी खालसाशी संबंधित असल्याचा संशय आहे.


गळ्यात फलक आणि हातात भाला घेऊन ते सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर बसले होते. यावेळी हल्ल्याचा प्रयत्न झाला. २ डिसेंबरला श्री अकाल तख्त साहीबने त्यांना ही शिक्षा दिली होती. २००७ ते २०१७ दरम्यान पंजाबमध्ये सत्तेवर असताना त्यांच्या पक्षाने आणि सरकारने केलेल्या चुकीबद्दल श्री अकाल तख्त साहीबने त्यांना ही शिक्षा सुनावली आहे.


A man opened fire at Shiromani Akali Dal leader Sukhbir Singh Badal at the entrance of Golden Temple Amritsar

हल्ला करण्यामागचं कारण ?


आरोपी खलिस्तान समर्थक असल्याचा संशय आहे. सुखबीर बादल यांच्यावर बेअदबी प्रकरणामुळे तो नाराज असल्याच बोललं जातय. शीख धर्मगुरुंकडून धार्मिक शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर सुखबीर सिंग बादल यांनी काल सेवादार म्हणून सेवा दिली. आज त्यांच्या ‘तनखाह’ म्हणजे शिक्षेचा दुसरा दिवस होता. काल बादल यांनी निळ्या रंगाचा सेवादारचा पोषाख परिधान केला होता. सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर हातात भाला घेऊन व्हीलचेअरवर बसून ते तैनात होते. त्यांचा पाय फ्रॅक्चर झाल्याने ते व्हीलचेयरवर बसले होते.

Comments
Add Comment

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना