Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा अ‍ॅक्शन मोडवर

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आठवडा उलटल्यानंतरही महायुतीत सुरू असलेला मंत्रिपद वाटपाचा गोंधळ अद्यापही कायम आहे. मुख्यमंत्रि‍पदासह अन्य महत्त्वाची खाती कोणाकडे असणार, याबाबत अद्यापही अस्पष्टता आहे. राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मागील चार दिवसांपासून आजारी असल्याने महायुतीतील चर्चेला ब्रेक लागला होता.



मात्र आता प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे आजपासून सक्रिय होणार असून शिंदे यांच्या नेतृत्वात विविध बैठका होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ६ डिसेंबर रोजीच्या महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी एकनाथ शिंदे हे सकाळी बैठक घेणार आहेत. त्यानंतर ते पक्षातील विविध नेत्यांना भेटतील. मागील दोन दिवस ठाण्यात असूनही तब्ब्येत बरी नसल्याने शिंदे यांनी आमदार खासदारांच्या भेटीगाठी टाळल्या होत्या. त्यामुळे आज ते मंत्रि‍पदासाठी इच्छुक असणाऱ्या आमदारांना भेटतील.


तसेच सत्तेत आपला वाटा कसा असावा, याबाबत ते शिवसेनेतील महत्त्वाच्या नेत्यांसोबत चर्चा करणार असल्याचे समजते.दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असल्याने महायुतीची रखडलेली एकत्रित बैठकही लवकरच होऊ शकते. याच बैठकीत उपमुख्यमंत्रिपदासह खातेवाटपाविषयी सविस्तर केली जाण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

प्रभादेवीतील साई सुंदर नगर आणि कामगार नगर दाेनमधील नाल्याच्या बांधकामाचा खर्च वाढला

नाल्याच्या रुंदीकरण कामासाठी विकासकाची केली नियुक्ती मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील प्रभादेवी येथील साई

पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्ग प्रवेश नियंत्रण प्रकल्पाचा पैसा वळवला रस्ते सिमेंट काँक्रिट कामांसाठी

रस्त्याचा निधी कमी पडल्याने तब्बल २५० कोटी रुपये करावे लागले वळते मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई

अतिरिक्त आयुक्त डॉ ढाकणे यांच्याकडे मालमत्ता विभागासह पर्यावरणाचीही जबाबदारी

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी डॉ अविनाश ढाकणे यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. डॉ

ज्ञानाच्या अथांग महासागरास महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन... भाषणाची सुरुवात करताना लक्षात ठेवा 'हे' मुद्दे

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६९वा महापरिनिर्वाण दिन आहे. या

इंदू मिलच्या जागेत महामानवाचे स्मारक प्रगतिपथावर

प्रवेशद्वार इमारत, संशोधन केंद्राची संरचनात्मक कामे पूर्ण मुंबई : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे

गोरेगाव, सांताक्रूझ दरम्यान रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक नाही मुंबई : पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या