Hashtag Tadev Lagnam: ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’मधील 'नकारघंटा' हे गंमतीशीर गाणं प्रदर्शित

मुंबई : शुभम फिल्म प्रोडक्शनच्या ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात असतानाच आता या चित्रपटातील एक धमाल गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. क्षितिज पटवर्धन लिखित 'नकारघंटा...' असे बोल असलेलं हे गाणं सुबोध भावेवर चित्रित करण्यात आलं असून पंकज पडघन यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्यात आदर्श शिंदे यांच्या दमदार आवाजानं अधिकच रंगत आणली आहे.

'हळूच मनाचं दार उघडून, रोज नवी येते आणि जाते वाजवून घंटा... नकारघंटा...' या ओळींमधूनच साधारण कल्पना प्रेक्षकांना आली असेलच. विवाहेच्छुक सुबोध भावे लग्नासाठी मुली बघताना दिसत असून अपेक्षांमध्ये न बसल्याने त्याला बहुतेक स्थळांकडून नकारच मिळत असल्याचं या गाण्यातून दिसतंय. सुबोधच्या आयुष्यातील ही नकारघंटा थांबून, तो बोहल्यावर चढणार का ? हे उत्तर जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना २० डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. आनंद दिलीप गोखले लिखित, दिग्दर्शित या चित्रपटात सुबोध भावे, तेजश्री प्रधान, प्रदीप वेलणकर, मानसी मागिकर, संजय खापरे, शर्मिष्ठा राऊत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर शेखर विठ्ठल मते या चित्रपटाचे निर्माते आहेत.




गाण्याबद्दल दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले म्हणतात, ''चित्रपटाची कथा पुढे नेणारं हे एक मजेदार गाणं आहे. वय वाढलं की लग्न जमवणं हे एक मोठं आव्हान असतं आणि अशातही एखादी मनासारखी मुलगी मिळालीच तर तिच्या अपेक्षांच्या यादीत बसणं, हे त्याहूनही मोठं आव्हान असतं. मग अशा वेळी पचवावा लागतो, तो नकार... हेच गंमतीशीररित्या या गाण्यातून दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. या गाण्याचे बोल, संगीत आणि आदर्श शिंदे यांचा जबरदस्त आवाज हे सगळंच खूप छान जुळून आलं आहे.''

Comments
Add Comment

महापालिकेच्या प्रत्येक तक्रारींचे आता त्वरीत निवारण...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत आतापर्यंत आपण कुठल्याही प्रकारची तक्रार केल्यानंतर त्याला प्रतिसाद

मराठा आरक्षणाचा पेच उच्च न्यायालयात! ओबीसी कोट्यातील अध्यादेशावर आता कोर्टाची नजर

मुंबई: मराठा समाजाला इतर मागासवर्गीय (OBC) प्रवर्गातून आरक्षण देणाऱ्या राज्य सरकारच्या अध्यादेशाला आव्हान

मुंबई महापालिकेची प्रभाग रचना अंतिम, राज्य निवडणूक आयोगाची मान्यता

मुंबई  खास प्रतिनिधी : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक-२०२५ करिता प्रभाग रचनेस राज्य निवडणूक

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ड्रोन, फ्लाइंग कंदील उडविण्यास बंदी

मुंबई (वार्ताहर): दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षितता आणि शांतताभंग होऊ नये यासाठी पोलिसांनी

मेट्रो-५ साठी एमएमआरडीए २२ गाड्या खरेदी करणार

२ हजार ६४० कोटी रुपये खर्च मुंबई (प्रतिनिधी): 'ठाणे-कल्याण-भिवंडी मेट्रो ५' मार्गिकेसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास

मेट्रो-१ चा प्रवास घाट्याचा! उत्पन्न वाढीचा एमएमआरडीएचा मास्टर प्लॅन तयार

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील पहिली मेट्रो असलेली अंधेरी-घाटकोपर ही मेट्रो-१ मार्गिका घाट्यात चालत आहे. त्यातून