Vikrant Massey : ३७व्या वर्षी विक्रांत मॅसीचा अभिनयातून संन्यास; केली शॉकिंग पोस्ट

 Vikrant Massey : बॉलिवूडमधील विक्रांत मॅसी हा उत्तम अभिनेत्यांपैकी एक असून त्याने आत्तापर्यंत एकाहून एक सरस चित्रपटात उत्तम भूमिका केल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी आलेला ’12th फेल’ असो किंवा नुकतेच प्रदर्शित झालेले ‘सेक्टर 36’ आणि ‘द साबरमती रिपोर्ट’ या सर्व चित्रपटांमध्ये त्याच्या अभिनयाचं नाणं अगदी खणखणीत वाजलंय. 12th फेल या चित्रपटातील अभिनयासाठी तर विक्रांतला अनेक पुरस्कारही मिळाले. या चित्रपटानंतर त्याच नाव खूपच गाजलं. मात्र, २ डिसेंबरला विक्रांतने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली, त्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ती वाचून सगळेच हैराण झाले आहेत. वयाच्या ३७व्या वर्षी विक्रांत बॉलिवूडमधून संन्यास घेणार असल्याने त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. विक्रांतने अचानक हा निर्णय का घेतला त्याचं कारणही त्याने सांगितलं आहे. विक्रांतने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन त्याने अचानक बॉलिवूडमधून रिटायरमेंटचा निर्णय का घेतली, याविषयी माहिती दिलीय.



विक्रांतचा बॉलिवूडला अलविदा


विक्रांतने सोमवारी आज पहाटे सोशल मीडियावर पोस्ट करुन आपला हा निर्णय सर्वांना सांगितला. विक्रांत म्हणाला की, "गेले काही वर्ष माझ्यासाठी फार वेगळी आणि शानदार आहेत. तुमच्या पाठिंब्यांसाठी मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. परंतु मी आयुष्यात जसं पुढे जातोय तसं मला कळालं की एक पती, बाप, मुलगा आणि अभिनेता म्हणून आत्मपरिक्षण करायची गरज आहे. त्यामुळे आता पुन्हा घरी परतायची वेळ झाली आहे." २०२५ या वर्षांत मी तुम्हाला शेवटचं भेटेन. पुन्हा योग्य वेळ जोपर्यंत येत नाही तोपर्यंत (ही शेवटची भेट असेल.) दोन शेवटचे चित्रपट आणि अगणित आठवणी, सर्व गोष्टींसाठी खूप खूप धन्यवाद ‘ असं विक्रांतने त्याच्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.





पोस्टमुळे चाहते हैराण


दरम्यान, विक्रांतच्या या पोस्टनंतर त्यावर कमेंट्सचा अक्षरश: पाऊस पडलाय, त्याच्या या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला असून त्याचे चाहते तर हैराणच झालेत. अनेकांनी त्या पोस्टवर कमेंट करत निराशा जाहीर व्यक्त केली आहे. विक्रांतने असा निर्णय का घेतला, हे तर प्रत्येकालाच जाणून घ्यायचं आहे. तू असं का करतोयस ? तुझ्यासारखा अभिनेता क्वचितच समोर येतो, असं म्हणत एका चाहत्याने त्याला थेट सवाल विचारला आहे. हे खरं नाही, हे खरं नसाव अशी मला अशा आहे, अशा शब्दांत आणखी एका चाहत्याने त्याचं दु:ख व्यक्त केलंय.


गेल्या वर्षीच विक्रांतचा ’12वी फेल’ रिलीज झाला होता, ज्यावर लोकांनी भरभरून प्रेम दिल होत. त्यातील त्याच्या अभिनेयाचे खूप कौतुक झाले. तर नुकत्याच आलेल्या ‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटासाठी, त्याला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२४ मध्ये ‘पर्सनॅलिटी ऑफ द इयर’ हा पुरस्कार देण्यात आला होता.

Comments
Add Comment

Madhuri Dixit : लवकरच...! सोनी मराठी वाहिनीवरील 'कोण होणार करोडपती' चे सूत्रसंचालन करणार अभिनेत्री माधुरी दीक्षित

मुंबई : मराठी मनोरंजनविश्वात एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. सोनी मराठी वाहिनी आणि Sony LIV प्रेक्षकांचा ज्ञानावर

Sara Tendulkar : मला माझ्या होणाऱ्या नवऱ्यामध्ये हवाय असा गुण... सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकरचा मोठा खुलासा!

भारतीय क्रिकेटचा देव मानले जाणारे सचिन तेंडुलकर यांची लाडकी लेक सारा तेंडुलकर ही नेहमीच चाहत्यांच्या आणि सोशल

Govinda On Salman Khan: 'पाटर्नर, तू हिरोसारखा दिसत नाहीस...' गोविंदाचं 'ते' वक्तव्य अन् सलमान खानचं नशीब बदललं

बॉलिवूड अभिनेता गोविंदा आपल्या खासगी आयुष्याबद्दल नेहमीच चर्चेत असतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने

Dil Chahta Hai completes 25 years : तरुणाईला वेड लावणारा तो एव्हरग्रीन सिनेमा आणि आजही कायम असलेली 'त्या' गाण्याची क्रेझ!

बॉलीवूडमध्ये काही चित्रपट असे असतात, जे केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता प्रेक्षकांच्या आयुष्याचा आणि

AR Rahman Son Accident : प्रसिध्द संगीतकार ए.आर. रहमान यांच्या मुलाचा कार अपघात; थोडक्यात बचावला आमीन

चेन्नई : प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान (A R Rahman) यांचा मुलगा आणि गायक ए.आर. आमीन (A R Ameen) याचा कार अपघात झाल्याची धक्कादायक

Dashmi Movie Poster Launch : अन्यायाविरुद्ध उठणार ‘दशमी’ची गर्जना! रहस्य, संघर्ष आणि स्त्रीशक्तीची कहाणी घेऊन मराठी चित्रपटाची दमदार एंट्री

मुंबई : भारतीय संस्कृतीत विजयादशमी म्हणजे केवळ सण नाही, तर अन्यायावर न्यायाचा, अधर्मावर धर्माचा आणि दुष्ट