CM Oath Ceremony : मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याला 'पास' नसेल तर 'नो एन्ट्री'

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत मुख्यमंत्री आणि राज्याच्या नव्या सरकारचा गुरुवार ५ डिसेंबरला आझाद मैदानावर दिमाखदार शपथविधी सोहळा पार पडणार आहे. सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी भाजपचे अनेक पदाधिकारी मुंबईला रवाना होण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी 'झूम' बैठकीच्या माध्यमातून या कार्यक्रमाची सविस्तर माहिती सर्वांना दिली होती. या कार्यक्रमात सहभागी व्हायचे असेल तर ज्यांच्याकडे 'पास' असणे आवश्यक आहे, त्याबाबत पूर्व माहिती देऊन आता ज्यांच्या नावाने पास बनवला जाईल तेच भाजपचे पदाधिकारी या ऐतिहासिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकणार आहेत.

या कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे ग्रामीण भागातील पदाधिकारीही सहभागी होत आहेत. जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टी व महायुतीचे नवनिर्वाचित आमदार सुलभा खोडके, रवी राणा, प्रताप अडसड, प्रवीण तायडे, केवलराम काळे, उमेश यावलकर, राजेश वानखडे, जिल्हाध्यक्ष तथा खासदार डॉ. अनिल बोंडे, निवेदिता चौधरी, जिल्हाध्यक्षा अनिता तिखिले यांच्यासह अनेक अधिकारी ५ डिसेंबर रोजी आयोजित कार्यक्रमासाठी ४ डिसेंबरलाच सायंकाळी मुंबईकडे रवाना होतील.




५०० पदाधिकारी, कार्यकर्ते मुंबईतच


मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या शपथविधी कार्यक्रमासाठी भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते आधीच मुंबईत ठाण मांडून आहेत. या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळण्यासाठी 500 हून अधिक अधिकारी आधीच मुंबईत पोहोचले आहेत. अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.




'पास' नसेल तर 'नो एन्ट्री'


प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या की, ज्या भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नावे यादीत असतील त्यांनाच कार्यक्रमस्थळी तयार केलेल्या पासच्या आधारे प्रवेश दिला जाईल. पासशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे त्या यादीत आपलं नाव यावं यासाठी प्रत्येक जणांची स्पर्धा लागली आहे. सोमवार, २ डिसेंबर रोजी सायंकाळी उशिरा सर्व पदाधिकारी, कार्यकत्यांना पासेस उपलब्ध करून दिल्या जातील.

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.