Plastic Ban : अजूनही प्लॅस्टिक पिशव्या वापरताय, सावधान! होणार कठोर कारवाई

पिंपरी : केंद्र सरकारच्या (Central Government) पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने प्लॅस्टिक वेस्ट मॅनेजमेंटने जारी केलेल्या नियमानुसार प्लॅस्टिक पिशव्या वापरण्यास बंदी (Plastic Ban) घातली आहे. आरोग्याला घातक तसेच पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे सखल भागात पाणी साचण्याला कारणीभूत ठरणाऱ्या ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांवर काही वर्षांपूर्वी बंदी घालण्यात आली होती. मात्र अजूनही कित्येक जण प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरताना दिसून येतात. त्यामुळे आता पालिका प्रशासन पुन्हा अ‍ॅक्शन मोडवर आली आहे.



महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाने ‘महाराष्ट्र प्लॅस्टिक व थर्मोकोल अविघटनशील वस्तूंच्या (उत्पादन, वापर विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूक व तद्नंतर वेळोवेळी केलेल्या सुधारणा) अधिसूचना, २०१८’ संपूर्ण राज्यासाठी लागू करण्यात आली आहे. तसेच केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाने ३० सप्टेंबर २०२१ पासून ७५ मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या आणि ३१ डिसेंबर २०२२ पासून १२० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी करण्यात आली आहे. या नियम व अधिसूचनेची कठोर अंमलबजावणी शहरांमध्ये सुरू करण्यात आली आहे. परंतु अनेक ठिकाणी प्लॅस्टिक पिशव्यांची विक्री व खरेदी होत आहे. त्यामुळे सरकारने ठरवून दिलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांबाबत नियमांचे पालन करण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आयुक्त सिंह यांनी दिला आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्रात गारठा वाढला, काही भागांत पावसाची शक्यता!

पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या 'दितवाह' चक्रीवादळाचा परिणाम देशभर जाणवू लागला असून, अनेक राज्यांमध्ये

नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूक; २ डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी

मुंबई : नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होत असून, मतदानासाठी

मुलगा व्हावा म्हणून छळ; पैशांच्या मागणीला कंटाळून २५ वर्षीय गर्भवतीची आत्महत्या

नांदेड : मुलाच्या हव्यासापोटी आणि पैशांच्या सततच्या मागणीमुळे त्रस्त झालेल्या २५ वर्षीय गर्भवती विवाहितेने

राज्यात तीन दिवसांसाठी ड्राय-डे

नवी दिल्ली : राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी आजपासून तीन दिवसांसाठी ड्राय डे असणार आहे.

मतदानाच्या तोंडावर २० जिल्ह्यांत तारखांमध्ये बदल

नगर परिषदांसाठी २ ऐवजी २० डिसेंबरला मतदान राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय बारामती, मंगळवेढ्यासह अनेक नगर

पुण्यातील पंचतारांकीत हॉटेलला बॉम्बने उडवण्याची धमकी; पोलिसांची धावपळ, कॉल करणारा जेरबंद

पुणे : कोरेगाव पार्कमधील एका प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर शुक्रवारी