Gautam Adani : पुढे जायचे तर किंमत मोजावीच लागते!

अमेरिकेतील आरोपानंतर गौतम अदानी पहिल्यांदाच बोलले


जयपूर : अमेरिकेतील प्रकरणात अदानी पक्षाकडून कुणावरही एफसीपीएचे उल्लंघन अथवा न्यायात अडथळा आणण्याच्या कोणत्याही षडयंत्राचा आरोप करण्यात आलेला नाही, असे स्वत: अदानी समूहाचे अध्यक्ष आणि भारतातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी (Gautam Adani) यांनी सांगितले आहे.



पुरस्कार सोहळ्यावेळी अदानी म्हणाले, तुमच्यापैकी बहुतेकांनी हे वाचले असेल की दोन आठवड्यांपूर्वी आम्हाला अदानी ग्रीन एनर्जीमध्ये अनुपालन पद्धतींसंदर्भात अमेरिकेकडून आरोपांचा सामना करावा लागला. अशा आव्हानांना सामोरे जाण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. मी आपल्याला सांगतो की, प्रत्येक आव्हान आपल्याला मजबूत बनवते. प्रत्येक अडथळा अदानी समूहासाठी पायरी बनतो.


आजच्या जगात फॅक्ट्सच्या तुलनेत निगेटिव्हिटी अधिक वेगाने पसरते. आम्ही कायदेशीर प्रक्रियेप्रमाणे काम करत आहोत. मात्र, गेल्या काही वर्षांत आम्हाला ज्या अडथळ्यांचा सामना करावा लागत, ती आमच्या प्रगतीची किंमत आहे. आपली स्वप्न जेवढे धाडसी असतील, तेवढेच जग तुमची अधिक छाननी करेल. प्रत्येक राजकीय विरोधक आम्हाला आणखी बळ देतो.



काय आहेत आरोप


अमेरिकेतील न्युयॉर्कच्या एका न्यायालयात, गौतम अदानींसह सात जणांवर पुढील २० वर्षांत २ अब्ज डॉलर किंमतीचे सोलर पॉवर प्रोजेक्ट मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांना २६५ दशलक्ष डॉलरपेक्षा अधिक (सुमारे २२५० कोटी रुपये) लाच दिल्याचा आणि फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, अदानी समूहाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

Comments
Add Comment

अभिजात मराठी भाषा परिषद देशाच्या दृष्टीने महत्त्वाची - उदय सामंत

अमरावती : प्रत्येक भाषेने आपली अस्मिता उभी केली आहे. त्यामुळे ही अस्मिता अखंडपणे पुढे न्यायची असल्यास देशातील

नागपूरच्या दुय्यम निबंधक कार्यालयावर महसूल मंत्र्यांची धाड: लाचखोरी उघड, रोकड जप्त

नागपूर : नागपूरच्या दुय्यम निबंधक कार्यालयात चालणाऱ्या भ्रष्ट कारभारावर लगाम घालण्यासाठी राज्याचे महसूल

कार्तिकी एकादशीला कोण करणार पंढरपूरला विठ्ठलाची पूजा, शिंदे की पवार?

सोलापूर : दरवर्षी परंपरेनुसार आषाढी एकादशीला राज्याचे मुख्यमंत्री पूजा करतात. राज्याला उपमुख्यमंत्री असले तर

'लाडक्या बहिणी' भडकल्या! कारण काय?

मुंबई : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई-केवायसी बंधनकारक केले आहे. लाडकी बहीण

पापलेट उत्पादनात घट का झाली?

मत्स्य शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तलावांचे नियमन - मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे मत्स्य

पुणेकरांनी लावली महामेट्रोची वाट! गुटखा-पानाच्या तुंबा-यांनी रंगल्या भिंती, जीने आणि गाड्या...

पुणे मेट्रोत हजारो लाइटर, किलोंनी तंबाखू, गुटखा जप्त पुणे : सुसंस्कृत आणि विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या