Monday, February 10, 2025
Homeताज्या घडामोडीदररोज २ जीबी डेटासह २० जीबी डेटा मिळणार Free, Jioचा स्वस्त रिचार्ज

दररोज २ जीबी डेटासह २० जीबी डेटा मिळणार Free, Jioचा स्वस्त रिचार्ज

मुंबई: टेलिकॉम कंपनी जिओने(Jio) नुकतेच आपले प्लान्स महाग केले आहे. या दर वाढीमुळे जिओ युजर्स आता स्वस्त फायदेशीर असलेल्या प्लान्सच्या शोधात आहेत. आज आम्ही तुम्हाला जिओच्या अशा प्लानची माहिती देणार आहोत जे युजर्सला डेली डेटासह अतिरिक्त डेटाचीही सुविधा देतात. जाणून घेऊया या प्लानबद्दल…

जिओचा हा प्लान भरपूर प्रमाणात डेटा वापरण्यास देतो. जिओच्या या प्लानची किंमत ८९९ रूपये आहे. या प्लानमध्ये तुम्हाला डेली डेटासह २० जीबी एक्स्ट्रा डेटा फ्री मिळतो. या प्लानसोबत तुम्हाला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज १०० फ्री एसएमएस मिळतात.

इतकी आहे व्हॅलिडिटी

जिओच्या ८९९ रूपयांच्या प्लानमध्ये तुम्हाला ९० दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. जिओचा हा प्लान युजर्सला दररोज २ जीबी डेटा देतो. दरम्यान, या ऑफर अंतर्गत डेली डेटासह २० जीबी एक्स्ट्रा डेटी फ्री दिला जातो. या हिशेबाने ९० दिवसांची व्हॅलिडिटीसह हा प्लान तुम्हाला एकूण २०० जीबी डेटाचा अॅक्सेस मिळतो.

डेटा संपल्यानंतरही सुरू राहणार इंटरनेट

या प्लान आणि ऑफरमध्ये तुम्हाला डेटाची कमतरता होणार नाही. दररोजचा डेटा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड कमी होऊन @64 Kbps होतो. तर डेटाशिवाय जिओच्या या प्लानमध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळते. सोबतच दररोज तुम्हाला १०० फ्री एसएमएस पाठवू शकता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -