Shrikant Shinde : सत्ता आणि पद भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...

वडिलांसाठी श्रीकांत शिंदेंची भावूक पोस्ट


मुंबई : महाराष्ट्राचे काळजीवाहू आणि लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ म्हणून ओळखले जाणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ आता संपला आहे. गेले अडीच वर्ष त्यांनी जनतेसाठी अनेक योजना अस्तित्वात आणल्या. मात्र अडीच वर्षाच्या कालावधीनंतर आता राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार हे स्पष्ट झाले नसले तरीही मुख्यमंत्री पदाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असे एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. मात्र त्यांच्या या वक्तव्यावर शिंदे गटाचे कार्यकर्त्यांसह लाडक्या बहिणींकडून नाराजीचा सूर मारला जात आहे. तसेच त्यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी देखील वडिलांसाठी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.



काय आहे श्रीकांत शिंदेंची पोस्ट?


मला माझे बाबा आणि आमचे शिवसेना मुख्यनेते मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांचा खूप अभिमान वाटतो. त्यांची महाराष्ट्र आणि येथील जनतेशी असलेली अतूट बांधिलकी अतुलनीय आहे. त्यांनी अहोरात्र अथक परिश्रम केले. समाजातील प्रत्येक घटकाची निस्वार्थ सेवा करून त्यांचे प्रेम, विश्वास आणि प्रशंसा मिळवली. ते स्वतःला 'सीएम' म्हणजे 'कॉमन मॅन' समजत. त्यांनी सर्वसामान्यांसाठी वर्षा बंगल्याचे दार उघडले आणि जनसेवेत एक नवा इतिहास घडवला.


कारकिर्दीच्या शिखरावर असतानाही त्यांची नम्रता आणि कर्तव्यभावना दिसून येते. आज त्यांनी माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी आणि माननीय श्री. अमित शहाजी यांच्यावर विश्वास ठेवून, वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा युती धर्माचे पालन करत एक प्रगल्भ उदाहरण ठेवले आहे. सत्ता आणि पद अनेकदा सार्वजनिक जीवनावर वर्चस्व गाजवते. भल्याभल्यांना मोहात पाडते, पण शिंदे साहेब अपवाद ठरले. त्यांच्यासाठी जनसेवा आणि राष्ट्रनिर्मिती हे नेहमीच सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे आणि त्यांचा वारसा पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील. गोर - गरिबांचा आशीर्वाद आणि सदिच्छा हीच शिंदे साहेबांची खरी संपत्ती आहे. खूप अभिमान वाटतो बाबा!'', असे श्रीकांत शिंदे यांनी पोस्टमध्ये लिहले असून ही पोस्ट सोशल मीडियावे मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.




Comments
Add Comment

MPSC Paper Leak : 'एमपीएससी' पेपरफुटीप्रकरणात भाजप-शरद पवार गटात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) औषध निरीक्षक पदाच्या परीक्षा पेपरफुटी पेपरफुटीप्रकरणात भाजप

Jalgaon : हदयद्रावक ! झोका घेताना चिमुकल्याच्या गळ्याला दोरीचा फास लागला अन् क्षणात होण्याचं नव्हतं झालं

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद (Nashirabad) येथे हृदयद्रावक घटना समोर आली आहे. घरातील झोपाळ्यावर खेळताना झोक्याच्या

Sunetra Pawar : पिंपळवंडी पीडित कुटुंबाच्या मदतीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार; भावंडांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी

पिंपळवंडी येथील पीडित कुटुंबियांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा

Local Body Member Appointments : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा

- ग्रामविकास विभागामार्फत अध्यादेश जारी; पंचायत समितीला २० टक्के, तर जिल्हा परिषदेसाठी १० टक्के कोटा

Nitesh Rane : मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून ९ आणि ११ सप्टेंबरला धावणार 'मोदी एक्सप्रेस'

- गणेश भक्तांच्या सेवेसाठी गेल्या १४ वर्षांपासून उपक्रम; दादर रेल्वे स्थानकातून रेल्वे होणार मार्गस्थ मुंबई :

Mumbai Metro : मेट्रो मार्गिका ७ अ साठी अतिरिक्त उंचीच्या परवानगीची प्रतीक्षा; AAIकडून अंतिम अहवालाची MMRDAला अपेक्षा

मुंबई : मेट्रो मार्गिका ७ अ प्रकल्पातील OHE (Overhead Equipment) यंत्रणेसाठी आवश्यक अतिरिक्त उंचीच्या परवानगीचा मुद्दा सध्या