Tuesday, January 14, 2025
Homeताज्या घडामोडीTarapur : तारापूर गॅस लाईनमध्ये गळती, शॉर्ट सर्किटमुळे लागली आग

Tarapur : तारापूर गॅस लाईनमध्ये गळती, शॉर्ट सर्किटमुळे लागली आग

ठेकेदार आणि यंत्रणांचा निष्काळजीपणा; हजारो नागरिक व कामगारांचा जीव धोक्यात

तारापूर : तारापूर (Tarapur) औद्योगिक क्षेत्रातील जे ब्लॉक मध्ये दुपारी १.३० वाजताच्या दरम्यान एमआयडीसीतर्फे खोदकाम चालू असताना जेसीबीचा धक्का लागल्याने अंतर्गत इलेक्ट्रिक केबल शॉर्टसर्किट होऊन आग लागली. त्यातच गुजरात गॅसचे तारापूर औद्योगिक क्षेत्रातील अनेक कारखान्यांना बॉयलरसाठी लागणारे इंधन म्हणून गॅस पुरवठा करणारे पाईपलाईन जात असल्याने या पाईपलाईनलाही धक्का लागल्याचे व या ठिकाणी आग लागल्याचे अग्निशमन दलातर्फे सांगण्यात आले. एमआयडीसी कर्मचा-यांच्या निष्काळजीपणामुळे परिसरात मोठी दुर्घटना घडली असती.

यापूर्वी गुजरात गॅस लाईनचे काम चालू असताना दोन ते तीन वेळा दुर्घटना झालेल्या असतानाही संबंधित गुजरात गॅस एमआयडीसी एमएससीडीसीएल संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.

Uday Samant : शिंदेंच्या भूमिकेनंतर विरोधकांची कोल्हेकुई थांबली; शिवसेना उपनेते उदय सामंत यांची टीका

मे. जे. आर प्लास्टिक प्लॉट न. जे १८४ या कारखान्यासमोर एमआयडीसीचे ठेकेदारामार्फत खोदकाम सुरू असताना झालेल्या निष्काळजीपणामुळे सदरची घटना घडल्याचे समजते. याठिकाणी गुजरात गॅस पाईपलाईन मोठ्या प्रमाणावर लिकेज झाले असते तर परिसरातील अनेक कारखाने व या लगतच असलेल्या ठाकूर गॅलेक्सी, यशवंत सृष्टी या मोठ्या गृहसंकुलात याचा विपरित परिणाम झाला असता. तसेच पर्यावरणावर देखिल मोठ्या प्रमाणावर दुष्परिणाम जाणवला असता.

खोदकाम करणाऱ्या जेसीबी चालकास विचारणा केली असता एमआयडीसीचे कोणी अधिकारी सोबत नसल्याचे व खोदकाम करताना अंतर्गत इलेक्ट्रिक केबल आणि गॅस पाईपलाईनबाबत त्याला कोणीही माहिती दिली नसल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे एमआयडीसी एमएससीडीसीएल आणि गुजरात पाईपलाईनच्या अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा हजारो नागरिक व कामगारांच्या जीवावर बेतला असता. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य व कठोर पावले उचलण्याची व संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.

गुजरात गॅस, महावितरण व एमआयडीसी यांच्या समन्वयाच्या अभावामुळे आतापर्यंत तारापूर औद्योगिक क्षेत्रात झालेल्या दुर्घटना
  • दि. १०.१०.२०१८ ला एफ झोन मध्ये अतिउच्च दाबाची विद्युत वहिनी तुटल्याने अनेक कारखान्यांचा जवळपास ४-५ तासासाठी विद्युत पुरवठा खंडीत.
  • दि. १३.०१.२०१९ मुकट टँक जवळ गॅस पाईप लाईन टेस्टिंग करताना लिकेजची दुर्घटना.
  • दि. २३.०३.२०१९ रोजी एन टी झोन मध्ये गॅस लाईनचे खोदकाम करताना पाईप लाईन फुटल्याने जवळपास २५० हून अधिक कारखान्यांचा पाणीपुरवठा दोन दिवसांसाठी खंडीत झाला होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -