रांची: झारखंड(Jharkhand) मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन(Hemant Soren) यांनी आज गुरूवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल संतोष कुमार गंगवार यांनी झारखंडचे चौदावे मुख्यमंत्री म्हणून सोरेन यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. झारखंडच्या इतिहासात चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे ते पहिले राजकीय नेते ठरले आहेत.
रांची शहरातील मारोबाडी मैदानावर आयोजित या शपथविधी सोहळ्याला झारखंड मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिबू सोरेन, त्यांची पत्नी रुपी सोरेन, काँसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार, शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आरजेडीचे तेजस्वी यादव, काँग्रेस नेते तारिक अन्वर, समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव, तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन, अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान प्रामुख्याने उपस्थित होते.
शपथविधी सोहळ्यासाठी रांची शहरात विशेष सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थाही बदल करण्यात आला होता. नुकत्याच झालेल्या झारखंड विधानसभा निवडणुकीत सोरेन यांच्या नेतृत्त्वाखालील झारखंड मुक्ती मोर्चाखालील आघाडीला ८१ पैकी ५६ जागा मिळाल्या. तर ‘एनडीए’ आघाडीला फक्त २४ जागांवर समाधान मानावे लागले.झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन चौथ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री होणार आहेत. राज्याचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले शिबू सोरेन यांचे ते पुत्र आहेत.
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…