Western Railway: पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या ८३ रेल्वेगाड्यांच्या थांब्यात मोठे बदल

Share

मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन या भारतीय रेल्वेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी मोठे बदल करण्यात येत आहेत. याअंतर्गत, अहमदाबाद येथे बुलेट ट्रेन आणि अहमदाबाद स्थानक पुनर्विकासाच्या कामांसाठी पश्चिम रेल्वेमार्गावरून सुटणा-या लांब पल्ल्याच्या एकूण ८३ रेल्वेगाड्यांचा गुजरातमधील शेवटचा थांबा बदलण्यात आला आहे.

नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशन (एनएचएसआरसीएल) आणि रेल्वे लँड डेव्हलपमेंट कॉर्पोरशनच्या (RLDA) कार्यक्षेत्रात येणा-या कामांमुळे अहमदाबाद येथून सुटणा-या आणि अहमदाबाद येथे थांबा असलेल्या मेल, एक्स्प्रेस आणि मेमू गाड्यांच्या थांब्यांमध्ये बदल करण्यात आला आहे, असे पत्र रेल्वे मंडळाच्या कोचिंग विभागाचे संचालक संजय नीलम यांनी देशातील सर्व क्षेत्रीय रेल्वे महाव्यवस्थापकांना सोमवारी पाठवले आहे. मुंबईहून सुटणा-या कर्णावती, वातानुकूलित डबलडेकर, गुजरात एक्स्प्रेस अशा लोकप्रिय रेल्वेगाड्यांचा यात समावेश आहे. एकूण ४५ रेल्वेगाड्यांचा प्रवास अहमदाबादऐवजी साबरमती, वटवा, राजकोट, असारवा येथे संपणार आहे. १२ रेल्वेगाड्या अहमदाबादऐवजी मणिनगर येथून प्रवास सुरू करणार आहेत. ३४ गाड्यांचा अहमदाबाद स्थानकातील थांबा काढण्यात आला आहे. या गाड्यांना प्रवाशांच्या सुविधेसाठी मणिनगर आणि साबरमती स्थानकात अतिरिक्त थांबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

देशातील अत्यंत वर्दळीच्या रेल्वे टर्मिनलमध्ये अहमदाबाद रेल्वे टर्मिनलचा समावेश होतो. देशातील पहिल्या बुलेट ट्रेन टर्मिनलचे बांधकाम अहमदाबादमध्ये होत आहे. त्याचबरोबर, आरएलडीएकडून २३०० कोटींहून अधिक गुंतवणुकीच्या माध्यमातून अहमदाबाद स्थानकाचा पुनर्विकास करण्यात येत आहे. भविष्यातील या सुधारणा लक्षात घेता, लां पल्ल्याच्या काही रेल्वेगाड्यांच्या थांब्यांमध्ये बदल करण्यात येत आहे. बदललेल्या थांब्यांची अमलबजावणी लवकरच करण्यात येणार असून त्याची सविस्तर माहिती समाज माध्यमांतून देण्यात येईल, असे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या कामांत गुजरात राज्याने आघाडी घेतली आहे. बुलेट धावण्यासाठी वापी ते सुरत या दरम्यान खरेरा नदीवरील नऊ पुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. दरम्यान, मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील बुलेट ट्रेन स्थानक आणि सावली (घणसोली) येथील खोदकाम १०० टक्के झाले आहे. विक्रोळी येथे शाफ्टसाठीचे खोदकाम अंतिम टप्प्यात आले आहे.

अहमदाबादऐवजी मणिनगर येथून मुंबईसाठी सुटणा-या मेल-एक्स्प्रेस

१२९३४ अहमदाबाद-मुंबई सेंट्रल कर्णावती

१२९३२ अहमदाबाद-मुंबई सेंट्रल एसी डबलडेकर

२२९५४ अहमदाबाद-मुंबई सेंट्रल गुजरात एक्स्प्रेस

१९०३४ अहमबाद-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेस

मुंबईहून सुटणा-या या गाड्यांना मणिनगर, साबरमतीमध्ये अतिरिक्त थांबा

२२९५५ वांद्रे-भुज एक्स्प्रेस
२२९४५ मुंबई सेंट्रल-सौराष्ट्र एक्स्प्रेस
१९०२७ वांद्रे विवेक एक्स्प्रेस
१२४८० वांद्रे सूर्यनगरी एक्स्प्रेस
१४७०८ वांद्रे राणकपूर
१९२१७ वांद्रे-वेरावल,
१२९८९ दादर-अजमेर
२०४८४ दादर – भगत की कोठी
२०९०७ दादर-भुज-केवळ साबरमती
१२४९० दादर-बिकानेर

मणिनगर स्थानकात अतिरिक्त थांबा

२२९०३ वांद्रे-भुज
१४८०८ दादर-जोधपूर
२२९२३ वांद्रे-जामनगर

Recent Posts

उबाठाला राणेंचा दणका! सिंधुदुर्गात होणार १५०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!

२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…

4 minutes ago

ही कणकवली नव्हे, कुडाळ आहे! निलेश राणे यांच्याशी पंगा नको!

माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…

27 minutes ago

नाल्यातून गाळ काढताना ३० सेकंदाचा व्हिडीओ कंत्राट कंपनीला बंधनकारक

लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…

1 hour ago

PM Modi : आजची धोरणं, उद्याचं भारत! – पंतप्रधान मोदींचा नागरी सेवकांना मंत्र

PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…

1 hour ago

KKR vs GT, IPL 2025: गिल-बटलरची तुफानी खेळी, गुजरातने केकेआरसमोर ठेवले १९८ धावांचे आव्हान

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सची टक्कर गुजरात टायटन्सशी होत आहे. हा…

1 hour ago