Tuesday, February 11, 2025
Homeब्रेकिंग न्यूजEknath Shinde: एकनाथ शिंदे यांचे मध्यरात्री शिवसैनिकांना भावनिक आवाहन

Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांचे मध्यरात्री शिवसैनिकांना भावनिक आवाहन

मुंबई : विधानसभेच्या निकालात महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. आता भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी अशा तिन्ही पक्षाचे नेते, कार्यकर्ते मुख्यमंत्रीपद आपल्या पक्षाला मिळावे, यासाठी आग्रही आहेत. एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी शिवसेनेचे नेते मैदानात उतरले असून प्रसारमाध्यमांसमोर तशा प्रकारच्या प्रतिक्रियाही दिल्या जात आहेत. तर अजितदादांना किमान वर्षभर तरी मुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी त्यांचे कार्यकर्ते आग्रही आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी स्वतःहून सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भावनिक आवाहन केले आहे.

२६ नोव्हेंबर २०१९ रोजी अस्तित्वात आलेल्या १४ व्या विधानसभेची मुदत आज (२६ नोव्हेंबर) संपणार आहे. त्यामुळे आज मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय होऊन शपथविधी होणार का? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भाजपाने निवडणुकीत सर्वाधिक १३२ जागा जिंकल्या. त्यामुळे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्रीपद मिळावं, यासाठी भाजपाकडून प्रयत्न सुरू आहे.

8th Pay Commission : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे लवकरच येणार ‘अच्छे दिन’!

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री एक पोस्ट करत शिवसैनिकांना भावनिक आवाहन केले आहे.

महायुतीच्या प्रचंड विजयानंतर राज्यात पुन्हा एकदा आपले सरकार स्थापन होणार आहे. महायुती म्हणून आपण एकत्रित निवडणूक लढवली आणि आजही एकत्रच आहोत. माझ्यावरील प्रेमापोटी काही मंडळींनी सर्वांना एकत्र जमण्याचं, मुंबईत येण्याचं आवाहन केलं आहे. तुमच्या या प्रेमासाठी मी अत्यंत मनापासून ऋणी आहे. मात्र, अशा पद्धतीने माझ्या समर्थनार्थ कुणीही एकत्र येऊ नये, असं आवाहन मी करतो. पुन्हा एकदा माझी नम्र विनंती की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वर्षा निवासस्थान किंवा अन्य कुठेही एकत्र जमू नये. समर्थ आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी महायुती भक्कम होती आहे आणि यापुढेही भक्कमच राहील, असे ट्विट करत शिंदे यांनी समयसुचकता दाखवली असल्याची चर्चा सुरु आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -