नागपूर: नागपुरात विद्यार्थांना सहलीला घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाल्याची दुर्दैवी घटना आज, मंगळवारी सकाळी 9 वाजता घडली. नागपूर-वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरील पेंढरी गावाजवळ हा अपघात झाला. अपघातग्रस्त बसमध्ये नागपूर इथल्या सरस्वती शाळेतील विद्यार्थी होते. या दुर्घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाले असून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे.
RBI Governer Shaktikant Das: आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांची प्रकृती बिघडली
यासंदर्भातील माहितीनुसार नागपुरातील शंकरनगर परिसरातील सरस्वती शाळेच्या विद्यार्थ्यांची सहल आज, मंगळवारी वर्धा जिल्ह्यातील बोरधरण इथे जात होती. एकूण 5 बसेस शाळेच्या विद्यार्थ्यांनी घेऊन चालल्या होत्या. त्यापैकी 4 बस सुखरूप पुढे गेल्या परंतु, शेवटी असलेल्या बसच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून पेंढरी गावाजवळ हा अपघात झाला. यात अनेक विद्यार्थी जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ मिहान परिसरातील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच हिंगणा पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून युद्ध पातळीवर बचावकार्य सुरू आहे.