विमान क्षेत्रांचे अल्पकालीन आकर्षण

उमेश कुलकर्णी


२०१९ मध्ये देशांतर्गत विमान लाईन इंडिगोकडून मिळालेल्या तगड्या प्रतिस्पर्धेमुळे आणि कर्जाचा गाठोडे भारी होण्याबरोबरच विमानसेवेचे पंख तुटले आणि आणखी एक विमानसेवा बंद झाली, तिचे नाव होते जेट एअरवेज आणि आता तिच्या बंद होण्याबरोबरच आणखी एक विमान कंपनी बंद झाली. आता ही एअरलाईन कर्जाच्या डोंगराखाली सापडली आहे आणि तिचे वर येणे नामुश्कील आहे. किबहुना ती पुन्हा चालू होणे शक्यच नाही. तीन दशकांपूर्वी चालू असलेली जेट एअरवेज कंपनी उच्चतम न्यायालयाच्य एका निवाड्यानुसार बंद झाली आणि त्यानंतर काही दिवसांतच टाटांच्या विस्ताराचा विलय एअर इंडियात करण्यात आला. ११ वर्षांपूर्वी ही कंपनी अस्तित्त्वात आली होती आणि त्यानंतर ती आता लुप्त झाली आहे. वास्तविक जेट एअरवेजनंतर तिची सेवा उत्तम मानली जात होती. पण आता ती काळाच्या पडद्याआड गेली आहे. एका कंपनीचे दिवाळखोरीत जाणे आणि दुसरीचा विलय यावरून हे लक्षात येते की एप्रिल १९९० मध्ये सरकारने जी घोषणा दिली होती की खुली आकाशनीती यावरून विमानसेवाचे क्षेत्र किती उतार आणि चढावातून गेले आहे. भारतीय विमान क्षेत्राचा प्रवास अशा अनेक चढ-उतारांमधून जात आहे. या साडेतीन दशकांच्या कालावधीत जवळपास ४५ विमान कंपन्या सुरू झाल्या आणि बंद पडल्या. यातील काही कंपन्या अशा होत्या की ज्यांनी आपल्या विमान कंपन्यांचे दुसऱ्या विमान कंपन्यात विलीनीकरण केले, तर काहींनी विलय अधिग्रहण आणि आंतरिक पुनर्निर्माण तसेच आधुनिक स्वरूप देऊन आपल्या ओळखीला नवीन स्वरूप दिले. हे एक शाश्वत सत्य आहे की विमान क्षेत्र हे जगातील सर्वात अनिश्चिततावाले क्षेत्र आहे आणि युद्ध, इंधनच्या किमतीत चढ-उतार, तसेच ज्वालामुखी विस्फोट, अशा अनेक घटनांनी त्य़ाच्यावर परिणाम होत असतो. त्याशिवाय अचानक होत असलेल्या घटनांचा त्याच्यावर परिणाम होत असतो.


विमान टर्बाईन इंधन, विमान पट्टे आणि पायलट प्रशिक्षण अशा अनेक जोखीमवाल्या घटनांनी त्याच्यावर प्रतिकूल परिणाम होत असतो. भारतीय विमान क्षेत्र सर्वात जास्त जोखीम असलेल्या क्षेत्रात गणले जाते. शिवाय येथील नियामक प्रणालीही व्यवस्थित काम करत नाही आणि ही एक जोखीम आहे. असे असले तरीही गुंतवणूक मोठी असलेला हा उद्योग भारतीय उद्योगाला प्रचंड आकर्षित करत असतो. कित्येक कंपन्या बंद झाल्या तरीही गुंतवणूकदार या क्षेत्रात पाऊल टाकण्यास मुळीच घाबरत नाही. वर्ष १९९१ नंतर कित्येक कंपन्या वेगवेगळ्या क्षेत्रातील होत्या आणि त्यांनी चांगले नाव मिळवले. विमान कंपन्यांचे मालक कोण होते, तर मच्छीमारांपासून ते चिट फंड संचालक आणि शेअर मार्केटचे प्रसिद्ध खेळाडू हे होते. जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांचे संचालकांना या क्षेत्रात पैसा लावण्यास आकर्षित केले आहे आणि ते आजही आघाडीवर आहेत. तर त्यापैकी काही मागे पडले. मोदी लुफ्ट, दमानिया आणि कित्येक कंपन्या आकाशात आपली उपस्थिती लावल्यानंतर अल्पावधीतच लुप्त झाल्या. गो एअर, सारखी कंपनी काही काळानंतर बंद पडली. खास गोष्ट अशी होती की उद्योग क्षेत्रातील काही मंडळी अशीही होती की, ज्यांनी विमान क्षेत्रात नाव कमावले. या यादीत पहिले नाव येते ते इस्ट वेस्ट एअरलाईन्सचे. तिचे मालक तकीउद्दीन अब्दुल वहिद होते. ते केरळचे होते. पण तिचे संचालन सुरू झाल्यानंतर लगेचच गँगस्टरनी त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांचे प्राण घेतले. त्यांनी असे का केले याचा आजपर्यंत खुलासा झालेलाच नाही. पण त्यांच्या हत्येचा एअरलाईन्सवर खूप वाईट परिणाम झाला आणि बँकांनी कंपनीला कर्ज देणे बंद केले आणि अखेर १९९८ मध्य़े कंपनी बंद झाली.


नरेश गोयल यांच्या जेट एअर वेजने सुरू झाल्यावरच आपला ठसा उमटवला होता आणि खासगी क्षेत्रातील सर्वात यशस्वी कंपनी बनली. या कंपनीने सरकारी विमान कंपनीला जोरदार टक्कर दिली. पण गोयल यांच्या काही निर्णयांमुळे ती गाळात गेली. एअर इंडियाशी टाटांचे संबंध बऱ्याच अंशी नाटकीय राहिले आहेत आणि त्यात कधी चढ तर कधी उतार असतो. जेट विमान कर्मचाऱ्यांनी रात्री संप पुकारला होता आणि त्यासाठीच ती लक्षात राहील. दीड दशक विमान क्षेत्रावर आपली छाप सोडणाऱ्या जेट एअरवेजच्या नरेश गोयल यांच्यासाठी प्रदीर्घ काळ धामधुमीचे होते. पण त्यांनतर ते शांत झाले आणि आज तर कंपनीही बंद झाली आहे. किफायतशीर सेवा देण्यात तज्ज्ञ असलेली कंपनी अखेरीस कर्जाच्या सापळ्याखाली अडकली आणि कर्जदारांपासून वाचण्यासाठी लंडन येथे पळून गेले. कारण कंपनीवरील कर्जाचा डोंगर वाढत चालला होता. विजय माल्या कर्जदारांपासून वाचण्यासाठी लंडनला पळून गेले. किंग ऑफ गुड टाईम्स असे बिरूद मिरवणारे माल्या अखेरीस पळकुटे म्हणून विख्यात झाले. ज्या जी आर गोपीनाथ यांच्याकडून माल्या यांनी किंगफशर खरेदी केले होते ते चांगल्या स्थितीत होते. त्यांनीच एअर डेक्कनला किफायतशीर विमानसेवा म्हणून प्रस्थापित केले.
पण अनेक प्रयत्न करूनही ते आपल्या विमानसेवेला प्रतिष्ठा प्राप्त करू देऊ शकले नाहीत. यानंतर विमान क्षेत्रात इंडिगोने उड्डाण केले. पण एअरलाईन्सचे दोन भागीदार यांच्यातील भांडणे आणि मतभेद यामुळे लवकरच ही कंपनीही बंद पडली. अखेरीस हा विवाद आंतरराष्ट्रीय क्षेत्रात पोहोचला आणि निकाल लागायचा तो लागला. देशांतर्गत विमान वाहतूक क्षेत्रात मोठा वाटा असलेल्या वाहतूक क्षेत्रात प्रचंड उलाढाल आहे. हे क्षेत्र लवकरच प्रमुख क्षेत्र होईल. पण कित्येक एअरलाईन्स बंदच असतील.

Comments
Add Comment

२०३० पर्यंत पुनर्विकास प्रकल्प बदलणार मुंबईचे स्कायलाईन

उपनगरीय कॉरिडॉर ठरणार मुंबईच्या पुनर्विकास कहाणीचे प्रमुख केंद्र  मुंबईचा गृहनिर्माण बाजार मोठ्या बदलाच्या

Ask Private Limited व Hurun India अहवालातून गेमिंग कंपन्या बाहेर तर Zerodha नंबर १

मोहित सोमण: एएसके प्रायव्हेट लिमिटेड (Ask Private Limited) व हुरून इंडिया (Hurun India Limited) ने आपला पाचवा Ask Private Wealth Hurun India Unicorn and Future Unicorn 2025 अहवाल

आतापर्यंत ६ कोटी लोकांनी ITR भरला आयकर विभाग म्हणाले, 'आतापर्यंत.....

प्रतिनिधी:कर निर्धारण वर्ष (Income Tax Assesment Year) २०२५-२६ साठी आतापर्यंत सहा कोटींहून अधिक आयकर विवरणपत्रे (ITR Filings) दाखल

Explainer- ITR भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस ! 'या' १५ चुका टाळल्यास तुमचा आयटीआर चुकणारच नाही

आयटीआर (Income Tax Returns) भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक आहे. त्यामुळे एकप्रकारे करदात्यांना धाकधूक असते. त्यावेळी

आरबीआयकडून फोन पे ला २१ लाखांचा दंड

प्रतिनिधी:आरबीआयने (Reserve Bank of India) फोन पे या आघाडीच्या फिनटेक कंपनीला २१ लाखांचा दंड ठोठावला आहे. शुक्रवारी याबद्दल

Will the ITR filing 2025 date be extended? : ITR फायलिंगसाठी तांत्रिक अडचणी! आता फक्त इतके दिवस शिल्लक, ITR डेडलाईन वाढणार का? अपडेट जाणून घ्या

मुंबई : आयकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम मुदत आता अगदी जवळ आली आहे. करदात्यांसाठी १५ सप्टेंबर २०२५ ही शेवटची तारीख