Saturday, February 8, 2025
Homeताज्या घडामोडीPM Narendra Modi : संसदेत गदारोळ घालणाऱ्या लोकांना जनतेनेच नाकारले!

PM Narendra Modi : संसदेत गदारोळ घालणाऱ्या लोकांना जनतेनेच नाकारले!

पंतप्रधानांचे विरोधकांवर टीकास्त्र

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीचे निकाल (Assembly Election Result 2024) जाहीर झाले असून आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशनाला (Winter Session of Parliament) सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जनतेला संबोधित करताना विरोधकांवर टीकास्त्र सोडले आहे.

Devendra Fadnavis : महायुतीच्या विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांचे जनतेला पत्र; म्हणाले…

यंदाचे संसदेच हे सत्र विशेष असणार आहे. कारण ‘देशाची राज्यघटना लिहून ७५ वर्षे पूर्ण झाली असून संसदेत आम्ही सर्वजण मिळून संविधान उत्सवाला सुरुवात करणार आहे. त्यामुळे भारतीय संविधानासारखा इतका चांगला दस्ताऐवज आपल्याला मिळाला आहे’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

…म्हणून अशा लोकांना जनतेने नाकारले

विरोधक संसदेत येवून गोंधळ घालतात, त्यामुळे अशा लोकांना जनतेनेच नाकारले आहे. तसेच नविन उर्जा, उत्साह घेऊन आलेल्या नवनिर्वाचित खासदारांना हे गदारोळ घालणारे लोक बोलू देत नाहीत. त्यांच्या आवाज दाबला जातो, त्यामुळे संसदेमधील चर्चेमध्ये सर्वांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असे पंतप्रधानांनी म्हटले.

त्याचबरोबर, भारतातील मतदार लोकशाहीला समर्पित आहेत, त्यांचे संविधानाप्रती समर्पण आहे, त्यांचा संसदीय कार्यपद्धतीवरचा विश्वास आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सर्व आदरणीय खासदारांना हे अधिवेशन उत्साहाने आणि उत्साहाने पुढे नेण्यासाठी आमंत्रित करतो, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -