मुंबई : राज्यभरात सुरु असणाऱ्या विधानसभा निवडणुकीत (Assembly ELection 2024) महायुतीने (Mahayuti) घवघवीत यश मिळवले आहे. दरम्यान, महायुतीच्या विजयानंतर भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यातील जनतेला पत्र लिहिले आहे. या पत्राच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी जनतेचे आभार मानले आहेत.
विधानसभा निवडणुकीत फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजपने १४९ जागा लढवल्या होत्या, त्यापैकी १३२ जागांवर त्यांच्या उमेदवारांनी विजय मिळवला. तर महायुतीला २३६ जागा मिळाल्या आहेत. या यशाबद्दल देवेंद्र फडणवीसांनी जनतेला पत्र लिहित राज्यातील जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल आणि दिलेल्या प्रेमाबद्दल त्यांच्या समोर नतमस्तक होतो, अशा शब्दात आभार मानले आहेत.
प्रिय बंधु-भगिनींनो,
सप्रेम नमस्कार,महाराष्ट्र विधानसभा 2024 च्या निवडणुकीत महायुतीला मिळालेला महाविजय फक्त भाजपा-महायुतीचा नाही, तर महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या विश्वासाचा आहे. तुम्ही दाखवलेल्या या विश्वासासाठी आणि दिलेल्या प्रेमाबद्दल महाराष्ट्राच्या जनतेपुढे मी… pic.twitter.com/Ti6kOBuc59
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 24, 2024