Sunday, May 11, 2025

महामुंबईताज्या घडामोडीठाणे

३४ कोटींच्या कोकेनची तस्करी करणाऱ्या संशयिताला मुंबई विमानतळावरून अटक

३४ कोटींच्या कोकेनची तस्करी करणाऱ्या संशयिताला मुंबई विमानतळावरून अटक

मुंबई: महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) नुकतीच मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या कारवाईत सिएरा लिओन येथून आलेल्या एका लायबेरियन नागरिकाला ताब्यात घेतले. या प्रवाशाच्या ट्रॉली बॅगचे वजन असामान्यपणे अधिक असल्याचे आढळून आल्यामुळे डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी कसून तपासणी केली.


त्यामध्ये ट्रॉली बॅगच्या तळाशी चोर कप्प्यात पांढरी भुकटी असलेली दोन पाकिटे सापडली. प्रयोगशाळेतील तपासणीमध्ये ते कोकेन असल्याचे स्पष्ट झाले. त्याचे एकूण वजन 3496 ग्रॅम इतके असून, बेकायदेशीर बाजारात त्याचे मूल्य रु. 34.96 कोटी इतके आहे. संबंधित प्रवाशाला अटक करण्यात आली असून पुढील तपासणी सुरु आहे.

अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळ्या उद्ध्वस्त करण्यासाठी आणि अमली पदार्थांच्या धोक्यापासून नागरिकांचं रक्षण करण्यासाठी डीआरआय वचनबद्ध आहे

Comments
Add Comment