मुंबई : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडून (TRAI) सातत्याने नवे अपडेट्स जारी होत असतात. अशातच आता पुन्हा टीआरएआयचे नवे नियम (TRAI New Rule) लागू होणार आहेत. देशभरातील दूरसंचार सेवांच्या सुधारणा करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने नवीन दूरसंचार नियम लागू करण्याचे आदेश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या वेगवेगळ्या राज्यामध्ये परवानगीसाठी वेगवेगळे नियम आणि शुल्क आहेत, ज्यामुळे कंपन्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र आता मोबाईल नेटवर्कसाठी लागणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीसाठी ‘राईट ऑफ वे’ (RoW) हा नवीन नियम लागू करण्यात येणार आहे. यामुळे देशभरातील सर्व दूरसंचार कंपन्यांना एकसमान शुल्क आकारण्यात येणार आहे.
दरम्यान, हे नियम जिओ (JIO), एअरटेल (Airtel), बीएसएनएल (BSNL) आणि व्होडाफोन-आयडिया (Vi) या कंपन्यांसाठी लागू होणार असून नववर्षापासून टीआरएआयची नवी नियमावली जारी होणार आहे.
ROW नियमानुसार, परवानगी मिळवण्याची प्रक्रिया डिजिटल पद्धतीने होणार आहे. यामुळे राज्य सरकारांकडून दिल्या जाणाऱ्या परवानग्यांमध्ये पारदर्शकता येणार असून प्रक्रिया जलद व सोपी होईल. तसेच 5G टॉवर्सच्या उभारणीला गती मिळणार आहे.
मुंबई : दोन दिवसांपूर्वी वसईतील (Vasai Crime) एका सात वर्षीय चिमुकल्या मुलीच्या मृत्यूची घटना घडली…
कल्याण : वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेने (KDMC) कल्याणमधील सहजानंद चौकात सौरऊर्जेवर चालणारा…
मुंबई : सध्या बाहेर कुठेही बाहेर पडायचं झालं तरी चेहरा, अंग झाकेल असे कपडे घालूनच…
मुंबई : कधी मराठी - अमराठी तर कधी भूमिपुत्रांचे हक्क तर कधी उद्धव - राज…
जम्मू-काश्मीरसह उत्तर भारत हादरले काबूल : अफगाणिस्तान-ताजीकिस्तान सीमावर्ती भागात शनिवारी (दि. १९) भूकंपाचे तीव्र धक्के…
कोलकाता : वक्फ दुरुस्ती विधेयकावरून पश्चिम बंगालमध्ये उसळलेल्या हिंसाचारावर भाजप नेते आणि सुप्रसिद्धी अभिनेता मिथुन…