मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी (दुसऱ्या व शेवटच्या टप्प्यातील) बुधवारी मतदान पार पडले. या दोन्ही राज्यांच्या निवडणुकींचा निकाल येत्या २३ नोव्हेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे. तत्पूर्वी मतदान पार पडल्यानंतर अनेक वृत्तवाहिन्या, वृत्तसंस्था व खासगी संस्थांनी निवडणूक निकालांचे अंदाज जाहीर केले आहेत. बुधवारी जाहीर झालेल्या एकूण एक्झिट पोल्सपैकी प्रमुख १० संस्थांचे अंदाज (निवडणूक निकालाचे एक्झिट पोल) पाहिले तर त्यापैकी सहा अंदाज हे महायुतीच्या बाजूने आहेत, तर तीन संस्थांच्या मते राज्यात महाविकास आघाडीला बहुमत मिळू शकते. एका पोलमध्ये राज्यात त्रिशंकू स्थिती निर्माण होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान, अनेक एक्झिट पोल्समध्ये अपक्ष व इतर पक्षांच्या आमदारांची संख्या २० ते ३० च्या आसपास असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याचाच अर्थ राज्यात त्रिशंकू स्थिती झाल्यास किंवा महाविकास आघाडी व महायुती या दोन्ही आघाड्या बहुमताच्या जवळ पोहोचल्या तर या अपक्षांची व छोट्या पक्षांची भूमिका खूप महत्त्वाची असेल.
आघाडी व युती बहुमतापर्यंत पोहोचू शकली नाही तर दोन्ही बाजूचे पक्ष अपक्षांना व छोट्या पक्षांना आपल्याबरोबर घेऊन सत्तास्थापन करण्याचा प्रयत्न करतील. या काळात बंडखोरांचा भाव वधारलेला दिसेल. निवडून येण्याची क्षमता असलेल्या अपक्ष उमेदवारांपैकी बहुसंख्य उमेदवार हे वेगवेगळ्या पक्षांमधील बंडखोर आहेत. त्यांच्या पक्षाकडून, युती किंवा आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे या उमेदवारांनी पक्षाविरोधात जाऊन बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. राज्यातील सहाही प्रमुख पक्षांचे बंडखोर उमेदवार वेगवेगळ्या मतदारसंघांमधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काही मतदारसंघांमध्ये मविआ व महायुतीच्या दोन-दोन उमेदवारांमध्ये मैत्रीपूर्ण लढती देखील होत आहेत.
राज्यात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या एकूण उमेदवारांमध्ये तब्बल २,०८६ अपक्ष आहेत. यामध्ये १५० हून अधिक मतदारसंघात बंडखोर रिंगणात आहेत. यापैकी ३५ बंडखोर उमेदवार असे आहेत जे निवडणूक जिंकू शकतात.
समीर भुजबळ (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार), हिना गावित (भाजपा), कमल व्यवहारे (काँग्रेस), आबा बागुल (काँग्रेस), मनोज शिंदे (काँग्रेस), ययाती नाईक, मनीष आनंद (काँग्रेस), प्रवीण माने, (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी), दिगंबर दुर्गडे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार), बापू भेगडे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार), आशा बुचके (भाजपा), अतुल देशमुख (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार), किरण दगडे पाटील (भाजपा), गीता जैन, गायत्री शिंगणे, ज्योती मेटे (रासप), तौफिक शेख, राजा ठाकूर, अमोल देशमुख (काँग्रेस), याज्ञवल्क्य जिचकार, चंद्रपाल चौकसे, प्रमोद घरडे, नरेंद्र जिचकार, शोभा बनशेट्टी, राहुल जगताप (सपा), अबरीश अत्राम (भाजपा), प्रकाश निकम, हेमलता पाटील, बापू भेगडे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार), आशा बुचके (भाजपा), शरद सोनवणे (शिवसेना शिंदे गट), किरण दगडे पाटील (भाजपा), मनीष आनंद, प्रिती बंड, संभाजी झेंडे
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…
भालचंद्र ठोंबरे शुरसेन देशात चित्रकेतू नावाचा एक चक्रवर्ती राजा होता. तो अतिशय धार्मिक, सुंदर, सर्वगुणसंपन्न…
अॅड. रिया करंजकर कायदेशीर कामकाज करताना प्रत्येक वेळी स्टॅम्प पेपरची गरज भासते. हे स्टॅम्प पेपर…