‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
मुंबई : बॅरी जेनकिन्स (Barry Jenkins) यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘मुफासा: द लायन किंग’ (Mufasa: The Lion King) हा हॉलिवूड (Hollywood) चित्रपट भारतीय प्रेक्षकांमध्ये खूप चर्चेत आहे. बहुचर्चित असणाऱ्या या चित्रपटाचा काही दिवसांपूर्वीच इंग्रजीमधून ट्रेलर रिलीज झाला. त्यानंतर हिंदी भाषेत ट्रेलर कधी येणार असा प्रश्न असताना आता मुफासा: द लायन किंगचा हिंदी ट्रेलर रिलीज झाला आहे. यामध्ये शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) छोट्या मुलाचा आवाज घुमताना दिसणार आहे.
हॉलिवूडच्या या लोकप्रीय ॲनिमेटेड चित्रपटात शाहरुखसोबत त्याच्या दोन्ही सिंबांचा आवाज ऐकू येणार आहे. मुफासासाठी बॉलिवूड किंगखान शाहरुखसोबत त्याच्या दोन्ही मुलांनी म्हणजेच अबराम खान (Abram Khan) आणि आर्यन खान (Aryan Khan) यांनीही आवाज दिला आहे. हा चित्रपट २० डिसेंबर २०२४ रोजी इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
या कलाकारांचाही आवाज येणार ऐकू
बॅरी जेनकिन्स यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला या चित्रपटात शाहरुख, आर्यन आणि अबराम यांच्याशिवाय रफीकीच्या आवाजात मकरंद देशपांडे (Makrand Deshpande) पुंबाच्या आवाजात संजय मिश्रा (Sanjay Mishra), टिमॉनच्या आवाजात श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि मियांग चेंग यांनीही आवाज दिला आहे.