Monday, February 10, 2025
HomeदेशAdani Group : अदानींमुळे LIC ला १२,००० कोटींचा फटका!

Adani Group : अदानींमुळे LIC ला १२,००० कोटींचा फटका!

मुंबई : अमेरिकन न्यायालयाने गौतम अदानीसह (Gautam Adani) सह जणांवर लाच दिल्याचा आरोपाखाली दोषी ठरवल्यामुळे अदानी समुह गोत्यात अडकला आहे. फसवणूकीच्या (Bribery Case) आरोपामुळे काल अदानी समुहाचे सर्व शेअर २० टक्क्यांपर्यंत खाली कोसळल्यामुळे (Shares Fall) अदानी समुहासह गुंतवणूकदारांना झटका बसला. त्यानंतर आता अदानींमुळे एलआयसी‘ला (LIC) देखील मोठा फटका बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अदानी समूहाच्या शेअर्स (Adani Group Stock) गुंतवणूकदारांमध्ये एलआयसीचा देखील समावेश आहे. एलआयसीने अदानींच्या सात कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली होती. मात्र काल शेअर्समध्ये मोठी पडझड झाल्यामुळे एलआयसीला १२,००० कोटी रुपयांचे नुकसान झाले.

अदानी ग्रुप कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण झाल्यानंतर एलआयसीला सुमारे ५ हजार कोटी रुपयांचा तोटा झाला. तसेच, एलआयसी अदानी एंटरप्रायझेसमध्येही अंदाजे ३ हजार कोटी रुपयांचा फटका बसला. याशिवाय, अंबुजा सिमेंटच्या शेअर्समुळे एलआयसीला १२०० कोटी रुपयांचे नुकसान झाले. या तीन मोठ्या नुकसानीसोबतच, अदानी टोटल गॅसमध्ये ८०७ कोटी रुपये, अदानी एनर्जी सोल्युशन्समध्ये ७१६.४५ कोटी रुपये, अदानी ग्रीन एनर्जीमध्ये ५९२ कोटी रुपये आणि एसीसीमध्ये ३८१ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

अदानींविरुद्ध अटक वॉरंट जारी

दरम्यान, आता अदानी यांच्यावर आरोप न्याय विभागाच्या अंतर्गत गुन्हेगारी विभागाच्या उप सहायक अटॉर्नी जनरल लिसा एच मिलर यांनी केला असून याप्रकरणी रीतसर लेखी तक्रार पत्र देण्यात आले आहे. तसेच गौतम अदानी आणि सागर अदानी यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. (Adani Group)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -