Adani Group : अदानी समूहाला पुन्हा धक्का ! केनियाकडून अदानींचे सर्व प्रकल्प रद्द

केनिया : अमेरिका न्यायालयाने गौतम अदानी (Gautam Adani), सागर अदानी (Sagar Adani) आणि अझूर पॉवरच्या अधिकाऱ्यांना लाचखोरी प्रकरणात दोषी ठरवल्यामुळे अदानी समुहाचे सर्व शेअरर्समध्ये (Adani Group Shares) मोठी पडझड झाली. त्यामुळे अदानी समूहाला धक्का बसला होता. या धक्क्यातून सावरत असताना पुन्हा मोठा धक्का अदानी समूहाला बसला आहे.



केनिया सरकारने (Kenya Government) अदाणी समूहाला दुसरा धक्का दिला आहे. केनियाच्या ऊर्जा मंत्रालयासोबत अदानी ग्रुप ७३.६ दशलक्ष डॉलर्स (सुमारे ६,२१५ कोटी रुपये) च्या ऊर्जा प्रकल्पाचा करार करण्याची तयारी अदानी ग्रुपकडून सुरू होती. याअंतर्गत अदानी ग्रुप केनियामध्ये पॉवर ट्रान्समिशन लाइन तयार करणार होता. परंतु, आता केनिया सरकारने हा करार रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत, त्यामुळे अदानींना हा मोठा धक्का मानला जात आहे.



भ्रष्टाराचारामुळे केनिया सरकारने घेतला निर्णय


'भ्रष्टाराचाराबद्दल समोर आलेले पुरावे आणि विश्वासार्ह माहितीच्या आधारावर मी निर्णय घेण्यास मी मागेपुढे पाहणार नाही'. केनियामध्ये ३० वर्षांपासून विमानतळाचे नियंत्रण करणाऱ्या कंपनीशी अदाणी समूहाने भागीदारी करत नैरोबीमधील मुख्य विमानतळाचे आधुनिकीकरण करण्यासाठी करार केला होता. अतिरिक्त धावपट्टी आणि टर्मिनल बांधून देण्यासाठी करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या.


त्याचबरोबर अदाणी समूहाशी भागीदारी केल्यामुळे केनियातील मूळ कंपनीविरोधात गेल्या काही काळापासून निदर्शने सुरू होती. सप्टेंबर महिन्यात विमानतळ कर्मचाऱ्यांनीही बंद पुकारला होता. या करारामुळे त्यांच्या नोकऱ्यांवर गदा येईल आणि कामाच्या ठिकाणी अडचणी निर्माण होतील, असे राष्ट्राध्यक्ष रुटो (William Ruto) यांनी म्हटले.

Comments
Add Comment

Afghan Foreign Minister Muttaqi India Visit : अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री भारतात! संबंध दृढ करण्यावर दोन्ही देशांचा भर

नवी दिल्ली/काबूल : अफगाणिस्तानचे (Afghanistan) परराष्ट्र मंत्री अमीर मुत्ताकी भारत दौऱ्यावर असून नवी दिल्लीत दाखल झाले

सरकारी कामकाजावरील बंदीमुळे ‘नासा’चे कामकाज ठप्प !

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या सरकारी कामकाजावरील बंदीमुळे ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेचे कामकाज सध्या ठप्प झाले

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये भारताने पाकिस्तानला फटकारले!

संयुक्त राष्ट्रे : संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेमध्ये भारताने पाकिस्तानला खडे बोल सुनावले. पाकिस्तानचे वागणे

वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा

स्टॉकहोम : वैद्यकशास्त्रातील (मेडिसिन) २०२५ चा नोबेल पुरस्कार अमेरिकेच्या मेरी ई. ब्रंकॉ आणि फ्रेड रैम्सडेल तसेच

गाझातील सत्ता न सोडल्यास हमासची धुळधाण करू

डोनाल्ट ट्रम्प यांची ताकीद वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझामधील

नेपाळमध्ये मुसळधार पाऊस; भूस्खलनात १८ जणांचा मृत्यू

काठमांडू(वृत्तसंस्था): नेपाळमधील कोशी प्रांतात शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या