जम्मू : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आज दहशतवादी घुसखोरी प्रकरणी जम्मू-काश्मीरमध्ये धाडी टाकल्यात. यावेळी एनआयएने निमलष्करी दल (Paramilitary Force) आणि पोलिसांच्या मदतीने राज्यात एकाच वेळी ८ ठिकाणी छापे टाकले. यामध्ये रियासी, उधमपूर, रामबन, किश्तवाड आणि डोडाचा समावेश आहे.
मागील काही दिवसांमध्ये राज्यात घुसखोरीच्या प्रकारात वाढ झाली आहे. त्याची गंभीर दखल घेत राष्ट्रीय तपास संस्थेने ही कारवाई केली आहे. सुमारे आठवडाभरापूर्वी ‘एनआयए’ने दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवल्याप्रकरणी जम्मूच्या बजलहटा येथे साहिल अहमद याच्या घरावर छापा टाकला होता. तपासादरम्यान एनआयएला साहिल अहमदच्या खात्यात १५ लाख रुपये संशयास्पदरित्या जमा झाल्याचे आढळले होते. अहमदाबादच्या मोस्ट वॉण्टेड यादीत समाविष्ट असलेल्या हुमायून खान नावाच्या फरारी गुन्हेगाराने १५ लाख रुपयांची ही रक्कम जमा केल्याचेही स्पष्ट झाले होते.
साहिल अहमद याचा काका गुलजार अहमद मलिक १९९२ मध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बनला होता, असे एनआयएच्या तपासात समोर आले होते.. गेल्या काही वर्षांपासून तो पाकिस्तानातील सियालकोट येथे राहत होता. एनआयआयएच्या टीमने साहिल आणि त्याच्या काही नातेवाईकांचीही चौकशी केली होती. (NIA Action)
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.…
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…