Monday, February 10, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Assembly Election : नेत्यांचा विश्वास खरा ठरणार कि अतिआत्मविश्वास नडणार!

Maharashtra Assembly Election : नेत्यांचा विश्वास खरा ठरणार कि अतिआत्मविश्वास नडणार!

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election) मतदान प्रक्रिया पार पडली असून आता निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मात्र निकालाला एक दिवस बाकी असतानाच विजयाचा भारीच कॉन्फिडन्स असलेल्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी कुठे आपल्या नेत्यांची विजय रॅली काढली. तर कुठे नवनिर्वाचित आमदार म्हणून अभिनंदनाचे पोस्टर लावल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे या नेत्यांचा हा कॉन्फिडन्स खरा ठरणार का? की ओव्हर कॉन्फिडन्स नडणार, हे आता निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

Maharashtra Vidhan Sabha Elections 2024 Exit Poll : महायुतीच जिंकणार; एक्झिट पोल जाहीर! कोणाला किती मिळणार जागा?

यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये मतदारांनी बाहेर पडत चांगल्या संख्येने मतदान केल्याचे पाहायला मिळाले. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी चांगली आहे. त्यामुळे ही वाढलेली टक्केवारी कोणाचा ठोका चुकवणार याबाबत सध्या चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -