Saturday, February 8, 2025
Homeताज्या घडामोडीगोड कलाकारांसह ‘जिलबी’१७ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला

गोड कलाकारांसह ‘जिलबी’१७ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला

प्रसाद ओक, स्वप्निल जोशी, शिवानी सुर्वे पहिल्यांदाच एकत्र

मुंबई : गरम गरम ‘जिलबी’ ची गोड चव काही औरच असते. अशीच एक लज्जतदार ‘जिलबी’ आपल्या भेटीला येणार आहे, पण… मराठी चित्रपटरूपाने. आनंद पंडित मोशन पिक्चर्स निर्मित ही खुमासदार ‘जिलबी’ १७ जानेवारीला आपल्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे. अभिनेता प्रसाद ओक, स्वप्निल जोशी, शिवानी सुर्वे या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. या तिघांच्या जोडीला पर्ण पेठे, गणेश यादव, प्रणव रावराणे, अश्विनी चावरे, प्रियांका भट्टाचार्य या कलाकारांनी आपल्या अभिनयाने मनोरंजनाच्या या ‘जिलबी’चा खुसखुशीतपणा वाढवला आहे. या चित्रपटाचे आकर्षक असे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. पोस्टरमधील कलाकारांचे लूक लक्ष वेधून घेणारे आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कांबळे यांचे आहे.

Movie : ‘गुलाबी’ सिनेमाने प्रदर्शनापूर्वीच रचला इतिहास, कमावले तब्बल इतके कोटी

आनंद पंडित मोशन पिक्चर्स यांनी कायमच वैविध्यपूर्ण चित्रपटांची निर्मिती केली आहे. ‘जिलबी’ च्या निमित्ताने रसिक प्रेक्षकांचा आनंद द्विगुणीत करायला अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेन्मेन्ट प्रा.लिमिटेड यांच्या सहयोगाने मनोरंजनाची भन्नाट मेजवानी त्यांनी आणली आहे. एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट, उत्कृष्ट कलाकार यांना एकत्र पाहण्याची पर्वणी प्रेक्षकांना लाभणार आहे. सोशल माध्यमावर मजेशीर कोडं टाकत चित्रपटाच्या प्रमोशनाकरिता अनोखा फंडा वापरण्यात आला. त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

मराठी प्रेक्षकांसाठी ‘जिलबी’ हा चित्रपट जबरदस्त मनोरंजनाची ट्रीट असेल असं निर्माते आनंद पंडित सांगतात. गोड आणि गूढ अशी ‘जिलबी’ प्रेक्षकांना नक्की आवडेल आणि तिच्या मनोरंजनाचा चविष्ट आस्वाद प्रेक्षकांच्या मनात घर करेल असा विश्वास दिग्दर्शक नितीन कांबळे व्यक्त करतात.

‘जिलबी’चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद मच्छिंद्र बुगडे यांचे आहेत. छायांकन गणेश उतेकर यांचे आहे. कलादिग्दर्शन कौशल सिंग यांचे असून क्रिएटिव्ह दिग्दर्शन राहुल व्ही. दुबे यांचे आहे. रूपा पंडित आणि राहुल व्ही.दुबे सहनिर्माते असून कार्यकारी निर्माते महेश चाबुकस्वार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -