Assembly Election 2024 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात ६५.११ टक्के मतदान!

मुंबई : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी (Assembly Election 2024) आज सकाळी ७ ते ६ या वेळेत सर्वसाधारणपणे काही तुरळक अपवाद वगळता शांततेत मतदान झाले. सायंकाळी सहा वाजेपर्यंत ६५.११ टक्के मतदान झाले. गेल्या वेळी राज्यात ६१.४० टक्के मतदान झाले होते. तर आता येत्या शनिवारी, २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असून त्यात राज्याचा कारभारी कोण होणार? हे स्पष्ट होईल.


दरम्यान, महायुतीने महिला, वयोवृद्ध यांसह समाजातील विविध घटकांसाठी लागू केलेल्या योजनांवर मतदार राजा किती खुश आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे विरोधकांकडून विविध मुद्यांवर आरोप करून राज्य सरकारचे वाभाडे काढण्यात आले, याचाही मतदार कसा कौल देतो, हेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.



३० वर्षांमधील सर्वाधिक मतदान


विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात सायंकाळी ६ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ६५.११ टक्के मतदान झालं आहे. गेल्या ३० वर्षांमध्ये पहिल्यांदाच राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याचं पाहायला मिळालं आहे. १९९५ साली ७१.६९ टक्के मतदानाची नोंद झाली होती. अलीकडच्या काही वर्षांमध्ये राज्यात कधीच ६५ टक्क्यांहून अधिक मतदान झालं नव्हतं. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ६१.३९ टक्के मतदानाची नोंद झाली होती. तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ६१.४ टक्के मतदान झालं होतं. मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा ३.७ टक्के मतदान वाढलं आहे. ही मतदानाची वाढलेली आकडेवारी निवडणुकीच्या निकालात महत्त्वाची भूमिका बजावू शकते.



मतदानाचं प्रमाण वाढवण्याच्या प्रयत्नांना अपयश


मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर या चार मोठ्या शहरांमध्ये मतदानाचं प्रमाण वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने विशेष प्रयत्न केले होते. मात्र त्याला फारसे यश आले नसल्याचे पाहायला मिळाले. राज्यात सर्वाधिक ८२ टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील कागल मतदारसंघात झाल आहे. तेथे वैद्याकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादीचे (शरद पवार) समरजितसिंह घाटगे यांच्यातच चुरशीची लढत होत आहे. सर्वात कमी ४१ टक्के मतदान हे कल्याण पश्चिम मतदारसंघात झालं आहे. मंत्रालय व विधानभवन ही सत्तेची प्रमुख केंद्रे असलेल्या कुलाबा मतदारसंघांत टक्केवारी वाढवण्यासाठी बरेच प्रयत्न झाले असले तरी तिथे ४५ टक्केच मतदान झाले आहे.



सायंकाळी ६ वाजेपर्यंत झालेले मतदान



  • अहमदनगर - ७१.७३ टक्के

  • अकोला - ६४.९८ टक्के

  • अमरावती - ६५.५७ टक्के

  • औरंगाबाद- ६८.८९ टक्के

  • बीड - ६७.७९ टक्के

  • भंडारा - ६९.४२ टक्के

  • बुलढाणा - ७०.३२ टक्के

  • चंद्रपूर- ७१.२७ टक्के

  • धुळे - ६४.७० टक्के

  • गडचिरोली - ७३.६८ टक्के

  • गोंदिया - ६९.५३ टक्के

  • हिंगोली - ७१.१० टक्के

  • जळगाव - ६४.४२ टक्के

  • जालना - ७२.३० टक्के

  • कोल्हापूर - ७६.२५ टक्के

  • लातूर - ६६.९२ टक्के

  • मुंबई शहर- ५२.०७ टक्के

  • मुंबई उपनगर -५५.७७ टक्के

  • नागपूर - ६०.४९ टक्के

  • नांदेड - ६४.९२ टक्के

  • नंदुरबार- ६९.१५ टक्के

  • नाशिक - ६७.५७ टक्के

  • उस्मानाबाद - ६४.२७ टक्के

  • पालघर - ६५.९५ टक्के

  • परभणी - ७०.३८ टक्के

  • पुणे - ६१.०५ टक्के

  • रायगड - ६७.२३ टक्के

  • रत्नागिरी - ६४.५५ टक्के

  • सांगली - ७१.८९ टक्के

  • सातारा - ७१.७१ टक्के

  • सिंधुदुर्ग - ६८.४० टक्के

  • सोलापूर - ६७.३६ टक्के

  • ठाणे - ५६.०५ टक्के

  • वर्धा - ६८.३० टक्के

  • वाशिम - ६६.०१ टक्के

  • यवतमाळ - ६९.०२ टक्के मतदान झाले.


सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेले मतदान



  • अहमदनगर -  ६१.९५ टक्के

  • अकोला -५६.१६ टक्के

  • अमरावती - ५८.४८  टक्के

  • औरंगाबाद - ६०.८३ टक्के

  • बीड - ६०.६२ टक्के

  • भंडारा - ६५.८८ टक्के

  • बुलढाणा - ६२.८४  टक्के

  • चंद्रपूर - ६४.४८ टक्के

  • धुळे - ५९.७५ टक्के

  • गडचिरोली - ६९.६३ टक्के

  • गोंदिया - ६५.०९  टक्के

  • हिंगोली - ६१.१८ टक्के

  • जळगाव - ५४.६९ टक्के

  • जालना - ६४.१७ टक्के

  • कोल्हापूर - ६७.९७ टक्के

  • लातूर - ६१.४३ टक्के

  • मुंबई शहर - ४९.०७ टक्के

  • मुंबई उपनगर - ५१.७६ टक्के

  • नागपूर - ५६.०६ टक्के

  • नांदेड-  ५५.८८ टक्के

  • नंदुरबार- ६३.७२  टक्के

  • नाशिक - ५९.८५  टक्के

  • उस्मानाबाद - ५८.५९ टक्के

  • पालघर- ५९.३१ टक्के

  • परभणी - ६२.७३ टक्के

  • पुणे -  ५४.०९ टक्के

  • रायगड -  ६१.०१ टक्के

  • रत्नागिरी - ६०.३५ टक्के

  • सांगली - ६३.२८ टक्के

  • सातारा - ६४.१६ टक्के

  • सिंधुदुर्ग - ६२.०६ टक्के

  • सोलापूर - ५७.०९ टक्के

  • ठाणे - ४९.७६ टक्के

  • वर्धा -  ६३.५० टक्के

  • वाशिम - ५७.४२  टक्के

  • यवतमाळ - ६१.२२ टक्के मतदान झाले आहे.


दुपारी ३ वाजेपर्यंत झालेले मतदान



  • अहमदनगर -  ४७.८५ टक्के

  • अकोला - ४४.४५ टक्के

  • अमरावती -४५.१३  टक्के

  • औरंगाबाद - ४७.०५ टक्के

  • बीड - ४६.१५ टक्के

  • भंडारा - ५१.३२ टक्के

  • बुलढाणा - ४७.४८  टक्के

  • चंद्रपूर - ४९.८७ टक्के

  • धुळे - ४७.६२ टक्के

  • गडचिरोली - ६२.९९ टक्के

  • गोंदिया - ५३.८८  टक्के

  • हिंगोली - ४९.६४टक्के

  • जळगाव - ४०.६२ टक्के

  • जालना - ५०.१४ टक्के

  • कोल्हापूर -  ५४.०६ टक्के

  • लातूर - ४८.३४ टक्के

  • मुंबई शहर- ३९.३४ टक्के

  • मुंबई उपनगर-४०.८९  टक्के

  • नागपूर - ४४.४५ टक्के

  • नांदेड-  ४२.८७ टक्के

  • नंदुरबार- ५१.१६  टक्के

  • नाशिक - ४६.८६  टक्के

  • उस्मानाबाद - ४५.८१ टक्के

  • पालघर- ४६.८२ टक्के

  • परभणी - ४८.८४ टक्के

  • पुणे -  ४१.७० टक्के

  • रायगड -  ४८.१३ टक्के

  • रत्नागिरी - ५०.०४टक्के

  • सांगली - ४८.३९ टक्के

  • सातारा - ४९.८२टक्के

  • सिंधुदुर्ग - ५१.०५ टक्के

  • सोालपूर - ४३.४९ टक्के

  • ठाणे - ३८.९४ टक्के

  • वर्धा -  ४९.६८ टक्के

  • वाशिम -४३.६७  टक्के

  • यवतमाळ - ४८.८१ टक्के मतदान झाले आहे.


दुपारी १ वाजेपर्यंत झालेले मतदान



  • अहमदनगर -  ३२.९० टक्के

  • अकोला - २९.८७ टक्के

  • अमरावती - ३१.३२ टक्के

  • रंगाबाद - ३३.८९ टक्के

  • बीड - ३२.५८ टक्के

  • भंडारा- ३५.०६ टक्के

  • बुलढाणा- ३२.९१ टक्के

  • चंद्रपूर- ३५.५४ टक्के

  • धुळे - ३४.०५ टक्के

  • गडचिरोली-५०.८९ टक्के

  • गोंदिया - ४०.४६ टक्के

  • हिंगोली -३५.९७ टक्के

  • जळगाव - २७.८८ टक्के

  • जालना- ३६.४२ टक्के

  • कोल्हापूर- ३८.५६ टक्के

  • लातूर -  ३३.२७ टक्के

  • मुंबई शहर- २७.७३ टक्के

  • मुंबई उपनगर- ३०.४३ टक्के

  • नागपूर - ३१.६५ टक्के

  • नांदेड - २८.१५ टक्के

  • नंदुरबार- ३७.४० टक्के

  • नाशिक - ३२.३० टक्के

  • उस्मानाबाद- ३१.७५ टक्के

  • पालघर-३३.४० टक्के

  • परभणी-३३.१२टक्के

  • पुणे - २९.०३ टक्के

  • रायगड - ३४.८४  टक्के

  • रत्नागिरी-३८.५२ टक्के

  • सांगली - ३३.५० टक्के

  • सातारा -३४.७८ टक्के

  • सिंधुदुर्ग - ३८.३४ टक्के

  • सोलापूर - २९.४४

  • ठाणेे - २८.३५ टक्के

  • वर्धा - ३४.५५ टक्के

  • वाशिम - २९.३१ टक्के

  • यवतमाळ - ३४.१० टक्के



सकाळी ९ वाजेपर्यंत झालेले मतदान



  • अहमदनगर -  १८.२४ टक्के

  • अकोला - १६.३५ टक्के

  • अमरावती - १७.४५ टक्के

  • औरंगाबाद- १८.९८ टक्के

  • बीड - १७.४१ टक्के

  • भंडारा - १९.४४ टक्के

  • बुलढाणा - १९.२३ टक्के

  • चंद्रपूर - २१.५० टक्के

  • धुळे - २०.११ टक्के

  • गडचिरोली -३० टक्के

  • गोंदिया - २३.३२ टक्के

  • हिंगोली -१९.२० टक्के

  • जळगाव - १५.६२ टक्के

  • जालना - २१.२९ टक्के

  • कोल्हापूर- २०.५९ टक्के

  • लातूर १८.५५ टक्के

  • मुंबई शहर- १५.७८ टक्के

  • मुंबई उपनगर- १७.९९ टक्के

  • नागपूर - १८.९० टक्के

  • नांदेड - १३.६७ टक्के

  • नंदुरबार- २१.६० टक्के

  • नाशिक - १८.७१ टक्के

  • उस्मानाबाद- १७.०७ टक्के

  • पालघर-१९ .४० टक्के

  • परभणी-१८.४९ टक्के

  • पुणे - १५.६४ टक्के

  • रायगड - २०.४० टक्के

  • रत्नागिरी-२२.९३ टक्के

  • सांगली - १८.५५ टक्के

  • सातारा -१८.७२ टक्के

  • सिंधुदुर्ग - २०.९१ टक्के

  • सोलापूर - १५.६४

  • ठाणे१६.६३ टक्के

  • वर्धा - १८.८६ टक्के

  • वाशिम - १६.२२ टक्के

  • यवतमाळ -१६.३८ टक्के

Comments
Add Comment

पुण्यात गुरुवारी पाणीबाणी, पाणी जपून वापरण्याचे नागरिकांना आवाहन

पुणे : पुणे शहरातील जलकेंद्रांच्या दुरुस्ती कामामुळे गुरुवार २० नोव्हेंबर रोजी पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद

Maharashtra Cabinet Meeting : एकाच बैठकीत ६ मोठे निर्णय! परवडणारी घरे उपलब्ध होणार; फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात 'म्हाडा पुनर्विकास' धोरणावर शिक्कामोर्तब

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली आज, १८ नोव्हेंबर रोजी, राज्य मंत्रिमंडळाची

Hinjewadi Accident News : डंपरच्या जोरदार धडकेत बापलेकीची ताटातूट! मुलीचा जागीच मृत्यू, वडील जखमी; हिंजवडी हादरले

हिंजवडी : पुण्यातील हिंजवडी आयटी परिसरात (Hinjewadi Accident News) अवजड वाहनांच्या अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, काल

Suraj Chavan New House : 'गुलिगत किंग' बनला 'गृहस्थ'! भव्य हॉल, आकर्षक इंटिरिअर अन्... सूरज चव्हाणच्या हक्काच्या घराची 'पहिली झलक' पहाचं!

मुंबई : 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वातून घराघरात पोहोचलेले लोकप्रिय नाव म्हणजे सूरज चव्हाण. आपल्या खास "झापूक

Ladki Bahin Yojana E- KYC : लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! E-KYC ला ४३ दिवसांची मुदतवाढ, काय आहे संपूर्ण प्रक्रिया? वाचा

मुंबई : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' (Majhi Ladki Bahin Yojna) अंतर्गत सुरू असलेल्या ई-केवायसी (E-KYC) प्रक्रियेसाठी सरकारने

इलेक्ट्रिक एसटी बसला राज्यातील द्रुतगती मार्गांवर टोलमाफी

मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्याचा ई-शिवाई बसला फायदा मुंबई  : राज्य परिवहन महामंडळाच्या ई-बसला द्रुतगती