पैसे वाटपावरून ठाकरे-शिंदे गट आमनेसामने; पालघरमध्ये तणाव

पालघर : राज्यातील थंड हवामानातही पालघरच्या राजकीय वातावरणाने तापमान वाढवले आहे. पैसे वाटपावरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. या प्रकरणामुळे विष्णूनगर भागात तणाव निर्माण झाला, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.


विष्णूनगर भागातील वर्धमान सोसायटीमध्ये शिंदे गटाचे नगरसेवक रवींद्र म्हात्रे व अमोल पाटील वेळ संपून गेल्यानंतरही प्रचारासाठी गेले होते. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे की, प्रचाराच्या नावाखाली पैसे वाटप करण्यात येत होते. यावरून दोन्ही गटांमध्ये वाद निर्माण झाला. काही वेळातच दोन्ही बाजूचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले आणि शाब्दिक बाचाबाची झाली.



प्रसंगाची माहिती मिळताच पालघर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती शांत करत संशयित कार ताब्यात घेतली. मात्र, तपासणीत कारमध्ये पैसे किंवा इतर कोणत्याही प्रकारचे पुरावे आढळले नाहीत. पोलिसांनी दोन्ही गटांना समज दिली आणि तणाव निवळला.


प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले असून, अधिकृत तक्रारींचा तपास सुरू आहे. या घटनेने निवडणुकीनंतरही राजकीय संघर्ष कसा चिघळतो आहे, हे स्पष्ट झाले आहे.


पालघरमधील या घटनेने ठाकरे व शिंदे गटातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. हे प्रकरण भलेही थांबले असले तरी या राजकीय संघर्षाचा परिणाम स्थानिक वातावरणावर होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

हत्ती हटेना... वनविभाग पथक हतबल!

गोवा वन खात्याचे पथक सिंधुदुर्ग सीमेवर सतर्क ओंकार हत्ती आज दिवसभर नेतर्डे परिसरात ठाण मांडून असल्याने गोवा

सात वर्षांच्या बांधकामांनंतर खड्डेमय ‘पलावा’चे उद्घाटन

७२ कोटींच्या खर्चानंतरही उड्डाणपुलाला ‘निसरडा भागा’ची उपमा मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील कल्याण-शीळ

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व

अमेरिका रशियावर कठोर निर्बंध लादणार

नाटोला चीनवर ५० ते १०० टक्के टॅरिफ लादण्याची मागणी वॉशिंग्टन डीसी (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

मुंबईकरांना यंदा पाण्याचे ‘नो टेन्शन’

पुरवठा करणाऱ्या धरण, तलाव क्षेत्रांतील पाणीसाठा ९८.४० टक्के शेवटच्या १७ दिवसांत १.६० टक्के साठ्याचे