Politics: एकनाथ खडसे राजकारणातून निवृत्ती घेणार?

जळगाव: जेष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे(Eknath Khadse) यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली आहे. याशिवाय, खडसे यांनी जळगाव ग्रामीण, एरंडोल-पारोळा, आणि जामनेर मतदारसंघातील शरद पवार गटाच्या उमेदवारांसाठी प्रचार केला.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुढील निवडणुकीत सक्रिय सहभाग असणार की नाही, याबाबत निर्णय परमेश्वरावर सोडला असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत झालेल्या वादानंतर खडसे यांनी २०२० मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीने त्यांना विधान परिषदेवर आमदारकीची संधी दिली. मात्र, त्यानंतरही त्यांनी भाजपमध्ये परतण्याचे प्रयत्न सुरू ठेवले होते.


लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले. मात्र, भाजपकडून कोणतीही अधिकृत घोषणा न झाल्याने खडसे यांचा पक्षांतराचा प्रयत्न थांबला. रावेर लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार असलेल्या त्यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी त्यांनी काम केले होते. मात्र, लोकसभा निवडणूक संपल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत राहण्याचा निर्णय जाहीर केला. यावेळी पत्रकारांशी बोलताना खडसे म्हणाले की,आरोग्याच्या कारणांमुळे आता फारसा राजकीय प्रवास शक्य नाही. मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही, या विधानामुळे खडसे राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.


खडसे यांची कन्या रोहिणी यांना मिळालेली उमेदवारी आणि पक्षातील बदलत्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर, खडसे यांची भूमिका राष्ट्रवादीसाठी महत्त्वाची ठरली आहे. मात्र प्रकृती अस्वास्थ्य आणि वाढत्या वयानुसार त्यांनी आता राजकीय जबाबदाऱ्यांपासून दूर राहण्याचा विचार केला आहे. यामुळे खडसे यांची राजकीय कारकीर्द एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर आली असून, त्यांच्या पुढील वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी

केंद्राकडून महाराष्ट्राला ६,४१८ कोटी रुपयांचा आगाऊ हप्ता, उपमुख्यमंत्री पवारांकडून आभार

मुंबई : केंद्र सरकारने राज्य सरकारांना कराचे अग्रीम हस्तांतरण केले असून त्यापैकी महाराष्ट्राला ६ हजार ४१८ कोटी

IMD Weather Update : तिहेरी संकट! महाराष्ट्रासह १४ राज्यांवर पावसाचा धोका; IMD कडून 'हाय अलर्ट' जारी

नवी दिल्ली : भारताच्या समुद्र क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा मोठी नैसर्गिक घडामोड झाली असून, एकाच वेळी दोन कमी दाबाचे