Audi : तासाला २५० किमी धावणारी 'ऑडी' कार २८ नोव्‍हेंबरला लाँच करणार

औरंगाबादमध्‍ये असेम्‍बल केलेल्या नवीन ऑडी क्‍यू७ साठी बुकिंग्‍जचा शुभारंभ


पुणे : 'ऑडी' (Audi) या जर्मन लक्‍झरी कार उत्‍पादक कंपनीने भारतात नवीन 'ऑडी क्‍यू७' साठी बुकिंग्‍जना सुरूवात केली आहे. नवीन 'ऑडी क्‍यू७' ऑडी इंडिया वेबसाइट किंवा ‘मायऑडी कनेक्‍ट' अॅप्‍लीकेशनच्‍या माध्‍यमातून २,००,००० रूपयांच्‍या सुरूवातीच्‍या बुकिंग रकमेमध्‍ये बुक करता येऊ शकते.


औरंगाबादमधील एसएव्‍हीडब्‍ल्‍यूआयपीएल प्‍लांट येथे स्‍थानिक पातळीवर असेम्‍बल करण्‍यात आलेली नवीन ऑडी क्‍यू७ भारतात २८ नोव्‍हेंबर २०२४ रोजी लाँच करण्‍यात येईल. ३४० एचपी शक्‍ती आणि ५०० एनएम टॉर्क निर्माण करणारे शक्तिशाली ३.० लिटर व्‍ही६ टीएफएसआय इंजिन असलेली नवीन ऑडी क्‍यू७ फक्‍त ५.६ सेकंदांमध्‍ये ० ते १०० किमी/तास गती प्राप्‍त करू शकते आणि अव्‍वल गती २५० किमी/तास आहे.



ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंग धिल्‍लों म्‍हणाले, “ऑडी क्‍यू७ आमचे सर्वात आयकॉनिक उत्‍पादन असण्‍यासोबत सेलिब्रिटींसह सर्व लक्ष्‍य समूहांमध्‍ये लोकप्रिय आहे. नवीन ऑडी क्‍यू७ सह आम्‍ही सुधारित वैशिष्‍ट्ये, नवीन एक्‍स्‍टीरिअर डिझाइन आणि नवीन लक्षवेधक लाइट्स देत आहोत. आम्‍ही औरंगाबादमधील आमच्‍या ग्रुप प्‍लांटमध्‍ये नवीन ऑडी क्‍यू७ च्‍या स्‍थानिक असेम्‍ब्‍लीला सुरूवात केली आहे आणि २८ नोव्‍हेंबर २०२४ रोजी ही वेईकल लाँच करण्‍यास सज्‍ज आहोत.''


नवीन ऑडी क्‍यू७ पाच एक्‍स्‍टीरिअर रंगांमध्‍ये उपलब्‍ध असेल. साखीर गोल्‍ड, वेटोमो ब्‍ल्‍यू, मिथोस ब्‍लॅक, समुराई ग्रे आणि ग्‍लेशियर व्‍हाइट. इंटीरिअर दोन रंगांच्‍या पर्यायांमध्‍ये ऑफर करण्‍यात येईल. सिडार ब्राऊन आणि सायगा बीज. ग्राहक ऑडी इंडिया वेबसाइट (www.audi.in) आणि ‘मायऑडी कनेक्‍ट' अॅपच्‍या माध्‍यमातून ऑनलाइन ऑडी क्‍यू७ (Audi) बुक करू शकतात.

Comments
Add Comment

कबूतराला वाचवताना ठाण्यात मोठी दुर्घटना; हायटेंशन वायरच्या धक्क्याने अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू

२८ वर्षीय उत्सव पाटील शहीद; सहकारी गंभीर भाजला, रूग्णालयात उपचार सुरू ठाणे : ठाणे शहरात दिवा-शील रोडवर रविवारी

राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : आठवडाभरापासून काहीशी विश्रांती घेतलेला पाऊस आता पुन्हा एकदा दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागाने

देशाची 'स्पेसटेक'मध्ये ऐतिहासिक झेप

भारताचा पहिला खासगी उपग्रह मिशन दृष्टी लवकरच प्रक्षेपित नवी दिल्ली :भारताची आघाडीची अवकाश-तंत्रज्ञान

अर्थशास्त्रासाठीचे पुरस्कार जाहीर

स्टॉकहोम : रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसने आज २०२५चा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर केला. यंदाचा

महाराष्ट्रात मंकी पॉक्सचा शिरकाव! धुळ्यात आढळला पहिला रुग्ण

धुळे :जगभरात थैमान घालणाऱ्या मंकी पॉक्सचा राज्यातील पहिला रुग्ण धुळ्यात आढळून आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच

आयआरसीटीसी घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव कुटुंबाच्या अडचणीत वाढ

न्यायालयाने आरोप केले निश्चित नवी दिल्ली :बिहार विधानसभा निवडणुकीच्या तयारी दरम्यान, आयआरसीटीसी घोटाळा