पुणे: कांदा पिकाची लागवड केलेली नसताना तपासणी झालेल्या नाशिक, अहिल्यानगर आणि सातारा जिल्ह्यांत मिळून एकूण ११ हजार ७८९ हेक्टर क्षेत्रावर बनावट पीक विमा उतरविल्याचे स्पष्ट झाले आहे. या तीनही जिल्ह्यांतील अहवाल प्राप्त झाले असून, त्यामध्ये बनावट कांदा पीक विमा क्षेत्र असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, बनावट अर्ज रद्द करण्याच्या सूचना देण्यात आल्यामुळे शासनाचे पीक विमा हप्त्यापोटी सुमारे ७ कोटी २६ लाख रुपयांच्या विमा रकमेची बचत झाल्याचे कृषी विभागातून स्पष्ट करण्यात आले.
नाशिक, धुळे, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यांत मिळून खरीप हंगामात कांद्याची एकूण ७५ हजार ७१३ हेक्टवर प्रत्यक्ष लागवड झाली. तर प्रत्यक्षात तब्बल २ लाख ६४ हजार २४७ हेक्टर क्षेत्रावर पीक विमा उतरविण्यात आला. म्हणजेच १ लाख ८८ हजार ५३४ हेक्टर क्षेत्रावर कांद्याचे पीक नसताना पीक विमा काढल्याचे स्पष्ट झाल्याने कृषी आयुक्तालयातून राज्यातील बनावट क्षेत्राची तपासणी करण्याच्या सूचना क्षेत्रीय स्तरावर देण्यात आल्या. त्याअन्वये नाशिक जिल्ह्यातील तपासणीत आत्तापर्यंत १ हजार ७७३ हेक्टर, अहमदनगर जिल्ह्यात ७३८ हेक्टर आणि सातारा जिल्ह्यात सर्वाधिक ९ हजार २७८ हेक्टर मिळून एकूण ११ हजार ७८९ हेक्टरवर बनावट पीक विमा उतरविल्याचे कृषी विभागाच्या ताज्या अहवालानुसार आढळून आले आहे.
राज्यात धुळे, पुणे, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, बीड या प्रमुख जिल्ह्यांचा कांदा पीक नसताना विमा उतरविलेल्या क्षेत्राच्या स्थितीचा अहवाल पुढील आठवडाअखेरीस मिळण्याची अपेक्षा आहे. त्यातून नेमकी वस्तुस्थिती समोर येण्याची अपेक्षा आहे. तसेच नाशिकमधील पूर्ण अहवाल अद्याप येणे बाकी असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
विधानसभा निवडणूक आचारसंहिता सुरू असून, कृषी विभागाचा अधिकारी- कर्मचारीवर्ग निवडणूक कामात गुंतलेला आहे. त्यामुळे बनावट कांदा पिकाचे क्षेत्र शोधण्यास वेळ लागत आहे. राज्यात धुळे, पुणे, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, बीड या प्रमुख जिल्ह्यांचा कांदा पीक नसताना विमा उतरविलेल्या क्षेत्राच्या स्थितीचा अहवाल पुढील आठवडाअखेरीस मिळण्याची अपेक्षा आहे. त्यातून नेमकी वस्तुस्थिती समोर येण्याची अपेक्षा आहे.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…