Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीमुळे शाळा- महाविद्यालयांना तीन दिवस सुट्टी!

  79

मुंबई : विधानसभा निवडणुकीचा (Assembly Election 2024) निकाल आठवडा भरावर येवून ठेपला असताना यासाठी येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान (Voting) होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा- महाविद्यालयांना तीन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ सुरळीतपणे पार पडण्यासाठी शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यामुळे शाळा भरवणं शक्य नसल्यामुळे, प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, १८, १९ आणि २० नोव्हेंबर रोजी शाळांना सुट्टी असणार आहे, असे आदेश शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी जारी केले आहेत. त्यानुसार, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक राज्यात सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यामुळे ज्या ठिकाणी शाळा भरवणे शक्य नसेल,  त्या ठिकाणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवण्याबाबतचा निर्णय घ्यावा, असे सांगितले आहे.

Comments
Add Comment

अंतरवाली सराटीमधून 27 ऑगस्टला मुंबईसाठी निघणार, जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टला सकाळी १० वाजल्यापासून मुंबईच्या आझाद मैदानावर

Atharv Sudame controversy: गणेशोत्सवापूर्वी व्हायरल झालेल्या 'त्या' रीलमुळे पुण्याचा कंटेंट क्रिएटर अथर्व सुदामे अडचणीत! मागितली माफी

पुणे: लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर अथर्व सुदामेच्या पुणेरी रील्सचे अनेक चाहते आहेत. सुदामेने त्याच्या

Mumbai Nanded Vande Bharat : मुंबई-जालना वंदे भारत आता नांदेडपर्यंत धावणार, जाणून घ्या वेळापत्रक, थांबे अन् तिकीटदर

मुंबई : मुंबई आणि मराठवाड्यातील प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू

वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता

सिंहगडावरुन बेपत्ता झालेला गौतम चार दिवसांनी दरीत जिवंत आढळला

पुणे : पुण्यातील सिंहगड किल्ल्यावरील तानाजी कडा येथून बेपत्ता झालेला २४ वर्षांचा गौतम गायकवाड जिवंत आहे. गौतम

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय, पुण्यात 27 ते 6 तारखेपर्यंत दारू बंदी

पुण्यामध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दारूबंदीचा निर्णय घेतला आहे. पुण्यात २७ ते ६