पुणे: महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या बुधवारी (दि. 20) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यातील प्रत्येक नागरीकाला लोकशाहीच्या या प्रक्रियेत सहभागी होता यावे, यासाठी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील मुख्य बाजारासह उपबाजार बंद ठेवण्यात येणार आहे.
यामध्ये, मुख्य बाजारातील फळ-भाजीपाला, कांदा-बटाटा विभाग, केळी आणि गुरांचा बाजार, गुळभुसार विभाग, भुईकाटा केंद्र, पेट्रोप पंप, फुल बाजार, पान बाजार तसेच मोशी, पिंपरी, मांजरी, उत्तमनगर व खडकी येथील उपबाजार बंद राहणार आहेत.
याची शेतकर्यांनी नोंद घ्यावी, शेतीमाल विक्रीस आणू नये तसेच ग्राहकांनी खरेदीस येऊ नये, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांनी परिपत्रकच्या माध्यमातून केले आहे