पुणे: पुणे -गोरखपूर एक्सप्रेस मध्ये तोतया तिकीट तपासणीस (टीसी) बनून प्रवाशांकडे पैसे वसूल करणाऱ्या तरूणास अटक करण्यात आली आहे. एक्सप्रेस मधील मुख्य तिकीट निरीक्षक यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला.
पुणे-गोरखपूर एक्सप्रेसने दौंड कॅार्ड लाइन रेल्वे स्थानक सोडल्यानंतर सर्वसाधारण डब्यात एक साध्या वेशातील आणि चांगली शरीरयष्टी असलेला तरूण तिकीट तपासत होता. त्याने काही प्रवाशांकडून रोख रकमा घेतल्या. परंतु त्याच्या पावत्या दिल्या नाहीत.
एक्सप्रेस विसापूर रेल्वे स्थानक येथे थांबली असता एक्सप्रेस मधील मुख्य तिकीट निरीक्षक शशीकांत धामणे यांनी सर्वसाधारण डब्यात प्रवेश करून तपासणी सुरू केली. तेव्हा प्रवाशांनी त्यांना एक तिकीट तपासणीस आताच तपासणी करून गेल्याचे सांगितले.