Sunday, August 2, 2026

Duleep Trophy 2026 Tilak Varma : तिलक वर्माच्या खांद्यावर मोठी जबाबदारी! दुलीप ट्रॉफीत दक्षिण विभागाचे कर्णधारपद; करुण नायरलाही संधी

Duleep Trophy 2026 Tilak Varma :  तिलक वर्माच्या खांद्यावर मोठी जबाबदारी! दुलीप ट्रॉफीत दक्षिण विभागाचे कर्णधारपद; करुण नायरलाही संधी

मुंबई : भारताच्या टी-20 संघाचा उपकर्णधार तिलक वर्मा (Tilak Varma) याच्यावर बीसीसीआयने (BCCI) आणखी एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. 23 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या दुलीप ट्रॉफी 2026 स्पर्धेत (Duleep Trophy 2026) तो दक्षिण विभागाच्या (South Zone) संघाचे नेतृत्व करणार आहे. तर आंध्र प्रदेशचा रिकी भुई याची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

तिलक वर्मा (Tilak Varma) गेल्या काही काळापासून भारताच्या टी-20 संघातील महत्त्वाचा खेळाडू असून अलीकडेच त्याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारीही सोपवण्यात आली होती. त्याला आता दुलीप ट्रॉफीत कर्णधारपद देण्यात आल्याने भविष्यातील नेतृत्वासाठी बीसीसीआय त्याच्यावर विश्वास दाखवत असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे. तसेच आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघातही त्याला नेतृत्वाची भूमिका मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Duleep Trophy 2026)

दक्षिण विभागाच्या संघात करुण नायर (karun nayir) यालाही स्थान देण्यात आले आहे. भारतीय कसोटी संघात पुनरागमन करण्यासाठी तो प्रयत्नशील असून गेल्या वर्षी इंग्लंड दौऱ्यावर त्याला तब्बल आठ वर्षांनंतर संधी मिळाली होती. मात्र चार कसोटी सामन्यांत केवळ एक अर्धशतक झळकवल्यानंतर त्याला पुन्हा संघाबाहेर जावे लागले. आता दुलीप ट्रॉफीत दमदार कामगिरी करून पुनरागमनाची संधी मिळवण्याचे त्याचे लक्ष्य असेल. (Duleep Trophy 2026)

संघात अनुभवी यष्टीरक्षक एन. जगदीसन याचाही समावेश करण्यात आला आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीचा संतुलित मेळ असलेला दक्षिण विभागाचा संघ यंदा विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. (Duleep Trophy 2026)

थेट उपांत्य फेरीत प्रवेश :

गेल्या हंगामात दक्षिण विभागाने अंतिम फेरी गाठल्यामुळे यंदाच्या स्पर्धेत त्यांना थेट उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला आहे. 30 ऑगस्ट रोजी दक्षिण विभागाचा उपांत्य सामना खेळवला जाणार आहे. गतविजेता मध्य विभाग देखील थेट उपांत्य फेरीत पोहोचला असून त्या संघाचे नेतृत्व रजत पाटीदार करणार आहे.

दक्षिण विभागाचा संघ :

तिलक वर्मा (कर्णधार), रिकी भुई (उपकर्णधार), अभिनव तेजराना, एस. के. रशीद, के. हिमातेजा, आर. स्मरन, एन. जगदीसन, करुण नायर, टी. त्यागराजन, श्रेयस गोपाल, के. साई तेजा, टी. विजय, व्ही. कावेरप्पा आणि अमन खान. (Duleep Trophy 2026)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >