रत्नागिरी: विधानसभा निवडणुकीसाठी(Maharashtra Assembly Election) येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून ते २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत मासेमारी बंद ठेवण्याच्या मच्छिमारांना सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील सर्व मच्छीमार नौका बंदरांमध्ये ठेवण्याबाबत आणि मच्छीमारीशी संबंधित कोणतीही कामकाज न करण्याबाबत सर्व मच्छीमार सहकारी संस्थांमार्फत मच्छीमार नौका मालकांना सूचना देण्यात आली आहे, अशी माहिती सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय आनंद पालव यांनी दिली.
मासळी उतरविण्याच्या केंद्रावर नेमणूक करण्यात आलेले सुरक्षा रक्षक व सागर मित्र यांच्यामार्फत मतदानादिवशी देखरेख ठेवण्यात येणार आहे. याबाबत जिल्ह्यातील सर्व मच्छिमारी संस्थांची दूरदृश्यप्रणालीद्वारे १३ नोव्हेंबर रोजी बैठक घेऊन सूचना देण्यात आली आहे. मतदान केल्याशिवाय कोणतीही नौका मासेमारीस जाणार नाही याची दक्षता घेण्याबाबत सर्व मच्छिमारांना माहिती देण्याबाबत कळविण्यात आले आहे.
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…