Narayan Rane : सिंधुदुर्ग, रत्नागिरीत महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होणार!; खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केला विश्वास

कुडाळ मालवण विधानसभा महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ मालवणात महायुतीचा मेळावाच मंत्री उदय सामंत, निलेश राणे, दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थिती

मालवण : पंतप्रधान नरेंद्र मोदी गतिमान विकास आणि लोककल्याकारी योजना राबवत देश प्रगतीपथावर नेत आहेत. त्याचं धर्तीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वात महायुती सरकार राज्यात आदर्शवत असे काम करत आहेत. हे जनतेचे सरकार आहे. आगामी निवडणुकीत जनतेच्या मोठ्या पाठिंब्यावर पुन्हा एकदा महायुतीचेच सरकार विजयी होईल. सोबतच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, जिल्ह्यातून महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील, असा विश्वास खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी मालवण येथे बोलताना व्यक्त केला.


दरम्यान, खासदार नारायण राणे यांनी विरोधकांचा समाचार घेतला, विरोधकांचे विकासात योगदान काय?, उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात शाळा तरी सुरु केली काय ? मुख्यमंत्री असताना कोरोना काळात औषध खरेदीत कमिशन खाणारे हे लोकं आहेत. चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले पवार करू शकले नाहीत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करून दाखविले. लाडकी बहीण योजना घराघरात पोहोचली. अनेक योजना यां सरकारने आणल्या. त्यामुळे विरोधकांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करूया. कोकण हा महायुतीचा बालेकिल्ला सर्व जागा जिंकून अबाधित ठेऊया,असेही आवाहन खा. राणे यांनी केले.



कुडाळ मालवण विधानसभा महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ महायुतीचा मेळावा मालवण कुंभारमाठ येथील अथर्व सभागृहात पार पडला. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आग्रे, बाळू नाटेकर, मधुकर चव्हाण, राजेश हाटले यासह शिवसेना, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी निलेश राणे यांच्या मोठ्या मताधिक्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.


यावेळी खासदार नारायण राणे पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला मोफत धान्य दिले, उपचारासाठी पाच लाखापर्यंत खर्च आयुष्यमान योजनेतून होणार आहे, पंतप्रधान आवास योजनेतून बारा कोटी घरे उभारून दिली. अकरा कोटी कुटुंबाना नळपाणी योजनेतून पाणी उपलब्ध करून देण्यात आले. त्याच धर्तीवर महायुती सरकार अनेक जनहिताच्या योजना राबवत आहे. शेतकरी, कष्टकरी, मच्छिमार, तरुण वर्ग यासह सर्व घटकांसाठी हे सरकार तत्पर आहे. सोबतच विकासाचा आलेख गतिमान राहिला आहे. महायुती सरकार पुन्हा यावे, विकासाची गती कायम रहावी, हा जनतेचा निर्धार आहे. त्यामुळे जनतेच्या पाठिंब्यावर हे सरकार मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतील, असे खासदार राणे (Narayan Rane) म्हणाले.


अपप्रचाराला महायुतीचे कार्यकर्ते बळी पडणार नाहीत : निलेश राणे


येणाऱ्या काही दिवसात विरोधकांकडून अपप्रचार केला जाईल, अफवा पसरवल्या जातील, मात्र महायुतीचे कार्यकर्ते आजपर्यंत कोणत्याही अफवांना बळी पडले नाही आणि पडणारही नाहीत. २३ तारखेला रत्नागिरी, सिंधुदुर्गातून महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील, सर्वत्र विजयी रॅली निघेल, असे निलेश राणे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

भारत-पाकिस्तान सामन्यावर बीसीसीआयचा बहिष्कार?

मॅचमध्ये दिसणार नाहीत बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान संघात रविवारी (१४ सप्टेंबर) दुबई

जर्सीचे प्रायोजक १५-२० दिवसांत निश्चित होणार: राजीव शुक्ला

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट जर्सीला प्रायोजक मिळण्यासाठी आणखी २ ते ३ आठवड्यांची वाट पाहवी लागणार आहे, असे

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

देशात पहिलाच उपक्रम; दिल्लीत ‘हाय-टेक हॉटलाईन व्हॅन’चे अनावरण

नवी दिल्ली: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज राष्ट्रीय राजधानीची पहिली 'हॉटलाईन मेंटेनन्स व्हॅन'