पाहा काय आहेत आजचे दर?
मुंबई : ऐन सणासुदीच्या काळात सोनं चांदीच्या दराने उच्चांक गाठला (Price Hike) होता. मात्र दिवाळी सरताच या आठवड्याच्या सुरुवातीपासून सोन्याच्या दरात मोठी घसरण (Gold Price Fall) झाल्याचं पाहायला मिळत आहे. मागील १५ दिवसांत सोनं तब्बल ६ हजार रुपयांनी स्वस्त झाले आहे. तसेच चांदीचेही दर उतरत असल्यामुळे खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे.
Falling Markets : हे ४ शेअर्स तुम्हाला घसरत्या मार्केटमध्ये देतील बक्कल फायदा!
आजचे सोन्याचे दर
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव १ हजार ३१६ रुपयांनी घसरून ७३ हजार ९४४ रुपयांवर आला. २२ कॅरेट सोनं ६७ हजार ७३३ रुपये आणि १० कॅरेट सोनं ५५ हजार ४५८ रुपये आहे.
चांदीची किंमत काय?
मागील महिन्यात चांदीचा दर ९९ हजार १५१ रुपयांवर पोहोचला होता. त्यानंतर आता चांदीचे दर २ हजार १८९ रुपयांनी घसरुन ८७ हजार ५५८ रुपये प्रति किलो झाला आहे. (Gold-Silver Rate Today)
इतर शहरातील सोन्याचे दर काय?
- मुंबई, कोलकाता आणि चेन्नई शहरात १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत ६९ हजार ३५० रुपये आणि १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत ७५ हजार ६५० रुपये आहे.
- दिल्ली येथे १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत ६९ हजार ५०० रुपये आणि १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत ७५ हजार ८०० रुपये आहे.
- भोपाळमध्ये १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत ६९ हजार ४०० रुपये आणि १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत ७५ हजार ७०० रुपये आहे.