साईच्या द्वारकामाईतील तुलसी विवाह सोहळ्याची परंपरा आजही कायम !

शिर्डी: विश्वाला श्रद्धा आणी सबुरीचा संदेश देणाऱ्या श्री साईबाबांनी ६० वर्ष वास्तव केलेल्या शिर्डीतील पवित्र द्वारकामाई मध्ये रूढी परंपरेनुसार बुधवारी सायंकाळी तुळसी विवाह मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला.दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री साईबाबा संस्‍थानच्या वतीने तुलसी विवाहाचे श्री द्वारकामाई मंदीर येथे आयोजन करण्यात आले होते.


तुलसी विवाह निमित्ताने सायंकाळी साडेसहा ते साडेसात यावेळेत द्वारकामाई मंदीराच्‍या सभामंडपात साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर यांच्‍या हस्‍ते तुलसी विवाह पूजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी श्रीगणेश पूजन, नैवेद्य दाखविणे आदी कार्यक्रम पार पडले.


तर शिर्डी ग्रामस्थांनी देखील आपापल्या घरी तुलसी विवाह मोठ्या उत्साहात साजरा केला असून शहरात सर्वत्र आकाशात फटाक्यांची अतिशबाजी बघायला मिळाली. साईबाबांच्या द्वारकामाई मंदिरातील हा आगळ्यावेगळा तुलसी विवाह सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने साईभक्त उपस्थित होते.

Comments
Add Comment

पार्थ पवारांच्या जमीन घोटाळा प्रकरणात शितल तेजवानींची पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने केली पाच तास चौकशी!

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या फर्मशी संबंधित पुणे जमीन व्यवहार प्रकरणात पुणे

धक्कादायक! नाशिकनंतर पुण्यातही चिमुकलीवर अत्याचार, ऊसतोड कामगाराचे अमानुष कृत्य

पुणे: नाशिकच्या मालेगावातील चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्येचा विषय ताजा असतानाच, पुण्यातून एक बातमी समोर आली

पुण्यात म्हाडाची मोठी घोषणा; ४ हजारांहून अधिक घरांसाठी वाढीव मुदत

पुणे : पुणेकरांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे,

पुणे गृहनिर्माण मंडळातर्फे करण्यात येणाऱ्या सदनिका सोडतीच्या अर्जाची मुदत वाढली

पुणे: पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीएसह सोलापूर, कोल्हापूर व

४५ आयटीआयमध्ये सुसज्ज प्रयोगशाळांची उभारणी

८ हजार विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी मुंबई : राज्यातल्या तरुणांना दर्जेदार रोजगाराभिमुख औद्योगिक प्रशिक्षण

राज्यातील फार्मसी अभ्यासक्रमांच्या यंदाही २५ ते ३० टक्के जागा रिक्त

मुंबई  : कोरोना महामारीत फार्मसी उद्योगाला मिळालेल्या महत्त्वामुळे या क्षेत्रातील अभ्यासक्रमांची लोकप्रियता