Suprim Court: बुलडोझर कारवाईपूर्वी १५ दिवसांची नोटीस आवश्यक- सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली: कुठल्याही मालमत्तेवर बुलडोझर कारवाईपूर्वी १५ दिवस आधी नोटीस देणे आवश्यक आहे. कारवाईपूर्वी १५ दिवसांची नोटीस दिल्याविना मालमत्ता पाडता येणार नसल्याचे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेय. बुलडोझर कारवाई विरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज, बुधवारी नाराजी व्यक्त केली. न्यायालयाने सर्व राज्यांना निर्देश दिले की, केवळ आरोपी आहे म्हणून घर पाडता येत नाही, खटला चालवल्याशिवाय कोणालाही दोषी ठरवता येणार नाही.सर्वोच्च न्यायालयाने देशातील सर्व राज्यांसाठी मालमत्ता पाडण्यासंदर्भातील ही मार्गदर्शक तत्त्वे मांडली असल्याचे देखील स्पष्ट केले आहे. प्रशासन न्यायाधीश होऊ शकत नाही.



बेकायदेशीरपणे घर पाडले असल्यास नुकसान भरपाई द्यावी. राज्य किंवा प्रशासनाला एखाद्या व्यक्तीला दोषी घोषित करू शकत नाही आणि न्यायाधीश बनू शकत नाही आणि आरोपी व्यक्तीची मालमत्ता पाडण्याचा निर्णय घेऊ शकत नाही. मालमत्तेच्या मालकाला १५ दिवसांची पूर्वसूचना दिल्याशिवाय कोणतीही जमीन पाडू नये, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हंटले आहे. सामान्य नागरिकासाठी घर बांधणे ही अनेक वर्षांची मेहनत, स्वप्ने आणि आकांक्षा यांचा कळस आहे. कुटुंबासाठी घर सुरक्षितता आणि भविष्याची सामूहिक आशा मूर्त रूप देते. रात्रभर महिला, मुले रस्त्यावर पाहणे हे आमच्यासाठी योग्य दृश्य नाही. आणि जर राज्य किंवा प्रशासनाने आरोपीचे घर काढून टाकले गेले, तर अधिकाऱ्यांवर कारवाई करणे हा एकमेव मार्ग असेल, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

सौदी अरेबियाचा मोठा निर्णय! मद्यप्राशनास परवानगी

कडक नियमात शिथिलता सौदी अरेबिया : सौदी अरेबियातील कायदे शरिया (इस्लामिक धार्मिक कायदा)वर आधारित आहेत.

श्रीलंका टी-२० मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर

मुंबई : वर्ल्ड चॅम्पियन भारतीय संघ अखेरीस मोठ्या विश्रांतीनंतर मैदानावर उतरणार आहे. महिला एकदिवसीय विश्वचषक

महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

मुंबई : राज्यासह देशातील वातावरणात सातत्याने बदला होताना दिसत आहे. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा गेला असूनही

भारताचे द. आफ्रिकेसमोर १७६धावांचे लक्ष्य, हार्दिक पांड्याचे धमाकेदार अर्धशतक

कटक (वृत्तसंस्था) : कटकच्या मैदानात सध्या हार्दिक पांड्याच्या बॅटने आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली.

विठुनामाच्या जयघोषाने मुंबापुरी दुमदुमणार

मुंबई : वारकरी संप्रदायाच्या वैचारिक ऐश्वर्याचे दर्शन मुंबईकरांना घडावे यासाठी गेली २६ वर्ष सुरू असणारा

थ्री इडियट्सचा सिक्वेल २०२६ मध्ये येणार, सिनेप्रेमींची वाढली उत्सुकता

मुंबई : तब्बल १५ वर्षांनंतर बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि आयकॉनिक चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘थ्री