Monday, December 9, 2024
Homeसाप्ताहिकअर्थविश्वShare Market Holiday : विधानसभा निवडणूक मतदानादिवशी शेअर बाजाराला सुट्टी!

Share Market Holiday : विधानसभा निवडणूक मतदानादिवशी शेअर बाजाराला सुट्टी!

मुंबई : महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी एकाच दिवशी राज्यभरातील २८८ विधानसभा मतदारसंघात मतदान (Assembly Election Voting) पार पडणार आहे. या दिवशी उद्योग विभागांतर्गत येणार्‍या सर्व आस्थापनांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर आता भारतीय शेअर बाजार (Share Market) देखील बंद राहणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मतदानादिवशी म्हणजेच २० नोव्हेंबर रोजी स्टॉक मार्केटमध्ये बीएसई आणि एनएसईवरील सर्व कामकाज बंद असणार आहे. याशिवाय करन्सी मार्केट आणि कमोडिटी एक्सचेंजला देखील सुट्टी देण्यात आली आहे. याबाबतचे नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे.

रिलायन्सच्या कंपनीवर तीन वर्षांसाठी बंदी, शेअर गडगडले!

नोव्हेंबर महिन्यात १२ दिवस शेअर बाजार बंद

नोव्हेंबर महिन्यात एकूण १२ दिवस शेअर बाजार बंद राहणार आहे. यामध्ये दिवाळी आणि इतर सणानिमित्त सुट्ट्यांचा समावेश आहे. १ नोव्हेंबरला दिवाळीनिमित्त, १५ नोव्हेंबरला गुरुनानक जयंतीनिमित्त तर २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीनिमित्त सुट्टी असेल. तसेच नोव्हेंबरमधील शनिवार आणि रविवार मिळून १२ दिवस सुट्टी राहील. (Share Market Holiday)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -