Monday, December 9, 2024
Homeसाप्ताहिकअर्थविश्वरिलायन्सच्या कंपनीवर तीन वर्षांसाठी बंदी, शेअर गडगडले!

रिलायन्सच्या कंपनीवर तीन वर्षांसाठी बंदी, शेअर गडगडले!

बोगस कागदपत्र सादर करणे भोवले

मुंबई : अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवर कंपनीवर सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने कारवाई केली. निविदेत सहभागी होण्यासाठी अनिल अंबानींच्या कंपनीतर्फे बोगस कागदपत्र सादर केली गेली, यासाठी त्यांच्या कंपन्यांवर ही कारवाई होत असल्याचे निवेदन सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने दिले आहे.

त्यामुळे शुक्रवारी बाजार उघडताच रिलायन्स पॉवरच्या शेअरमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. ३ ऑक्टोबर रोजी रिलायन्स पॉवरचा शेअर ५४ रुपयांवर गेला होता. मात्र कारवाईनंतर आता शेअरची किंमत पडली असून तो ४१.४७ रुपयांवर आला. रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स NU BESS लिमिटेड या कंपनीला तीन वर्षांसाठी सरकारी कंपनीच्या निविदेत सहभागी होण्यापासून बंदी घातल्यामुळे आता अनिल अंबानी यांना धक्का बसला आहे.

मिंट वृत संकेतस्थळाने यासंबंधी बातमी दिली. या बातमीनुसार, महाराष्ट्र एनर्जी जेनरेशन लिमिटेड ज्याचे नाव आता रिलायन्स NU BESS लिमिटेड असे आहे. या कंपनीकडून सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्या होत्या. विदेशी बँकाद्वारे अर्नेस्ट मनीसाठी जी बँक गँरंटी देण्यात आली होती, ती बोगस असल्याचे लक्षात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आपल्या निवेदनात म्हटले की, निविदा भरणारी कंपनी मेसर्स रिलायन्स पॉवर लिमिटेडची उपकंपनी असल्यामुळे त्यांनी मूळ कंपनीच्या ताकदीचा वापर करून आर्थिक पात्रता पूर्ण केल्या होत्या. जेव्हा या प्रकरणाची तपशीलवार तपासणी करण्यात आली तेव्हा आढळले की, रिलायन्स NU BESS ने घेतलेले सर्व निर्णय हे त्यांची पालक कंपनी रिलायन्स पॉवरच्या सल्ल्यानुसार घेतले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -