बीड:भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बीडच्या परळी येथे राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. यावेळी त्यांनी भावनात्मक आवाहन केले. तसेच धनंजय मुंडे यांना आमदार बनविण्यासाठी जनतेकडे पाठिंबा मागितला. या सभेत त्यांनी त्या म्हणाल्या की, धनंजय मुंडे यांनी भाजपचं कमळ हाती घेतलं असतं तर बरं झालं असतं.
पंकजा मुंडेंनी जनतेला आवाहन केलं की, भाजपचं कमळ लक्षात ठेवा आणि राष्ट्रवादीच्या घड्याळाचं बटण दाबा. त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केलं की, त्यांचं आणि धनंजय मुंडेंचं राजकीय जीवन विरोधात काम करण्यात गेलं, त्यामुळे खूप उर्जा वाया गेली. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की देशात अनेक राजकीय परिवार एकमेकांच्या विरोधात लढत आहेत, मात्र आता या निवडणुकीत आपण एक आहोत हा संदेश द्यायला हवा. राजकारणात सन्मानाची लढाई असते; ती पैशाची किंवा सत्तेची नसते.
विधानसभा निवडणुकीसाठी येत्या २० नोव्हेंबरला मतदान होत आहे. तर २३ नोव्हेंबरला निवडणुकीची मतमोजणी होत आहे. त्यामुळे सर्वच पक्ष प्रचंड जोर लावून प्रचार करत आहेत. राज्यभरात प्रचाराचा प्रचंड धुरळा उडवला जात आहे. विरोधक